यवतमाळ सामाजिक

सोनखास हेटी येथील शेतातील लाईन चे पोल तुटले,शेतकऱ्यांच्या जीव धोक्यात

सोनखास हेटी येथील शेतातील लाईन चे पोल तुटले,शेतकऱ्यांच्या जीव धोक्यात

सोनखास हेटी येथील शेतातील वादळाने सिमेंटचे पोल मधामधून तुटल्याने तारांच्या साह्याने लटकून आहे हे पोल व तारा कधी पडेल याचा नेम नसल्याने येथील शेतकरी भीतीच्या वातावरणात आहे सध्या शेतात ज्वारी ची पेरणी केली,तर काही भागात जनावरांकरिता चाऱ्याची लागवन केली असून येथील तुटलेले पोल लवकर न बसवल्यास पीक हि वाळून जाणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

येथील वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान झाले तर गावतील अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली तर काहींच्या भिंतीही पडल्या या वादळाने मोठे नुकसान झाले तर येथील शेतातली तुटलेली पोल त्वरित बदलून लोखंडी पोल बसून देण्याची मागणी शेतकरी वर्गा कडून करण्यात येत आहे.

Copyright ©