यवतमाळ शैक्षणिक

शिवशक्ती महाविद्यालयात इंग्रजी भाषा दिन साजरा.

 

बाभूळगाव: प्रतिनिधी

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने इंग्रजी भाषा दिनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान महान नाटककार विल्यियम शेक्सपियर यांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा एस. काळमेघ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डॉ.सचिन एच. तेलखडे, सहायक प्राध्यापक, बाबाजी दाते कला आणि वणीज्य महाविद्यालय, यवतमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सी. त्रिकांडे उपस्थित होते.

प्रारंभी डॉ.सुधीर त्रिकांडे यांनी प्रमुख पाहुणे डॉ.सचिन तेलखडे यांचे स्वागत व सत्कार केला .कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा काळमेघ यांनी डॉ.सुधीर त्रिकडे यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

डॉ. सुधीर त्रिकांडे यांनी प्रास्ताविक करून इंग्रजी भाषा दिन साजरा करण्याचा उद्देश विशद केला. तर पारितोषिक वितरण समारंभाचे संचालन डॉ.निलेश पी. सुलभेवार यांनी केले.

यावेळी हस्तलेखन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा आणि ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना इंग्रजी विभागाकडून प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले. हस्तलेखन स्पर्धेत कु. निशा डी. डबले (बी. एस्सी. II), कु. दिक्षा वाघमारे (बी. एस्सी. III) आणि कु. अनिशा पी. घोडे (बी. कॉम. I) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे प्रोत्साहनपर पारितोषिक कु. अनुश्री एन. घोडे (बी. कॉम. III) यांना प्रदान करण्यात आले. स्पेलिंग स्पर्धेचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे कु. वैदेही एस. चौधरी (बी. ए. I), कु. किरण सी. कुयटे (बी. एस्सी. I) आणि कु. अवंतिका व्ही. कुबडे (बी. एस्सी. II) यांना देण्यात आले. या स्पर्धेचे प्रोत्साहनपर पारितोषिक कु. प्रियंका डी. कवलकर यांना प्रदान करण्यात आले. ऑनलाइन प्रश्नमंजुषामध्ये मंथन जी. कावळे (बी. ए. III), भूषण कांबळे (बी. ए. III) आणि श्री. शुभंक खोब्रागडे (बी. ए. III) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे प्रोत्साहनपर पारितोषिक कु. वैदवी के. उभाडकर (बी. ए. III) यांना प्रदान करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून आपले भाषण करताना डॉ. सचिन एच. तेलखडे यांनी ‘प्रॅक्टिस मेक्स अ मॅन पर्फेक्ट’ या इंग्रजी म्हणीचे महत्त्व विशद केले. प्रावीण्य मिळविण्यासाठी सरावाची भूमिका कशी महत्त्वाची असते हेही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. प्रतिभा एस. काळमेघ यांनी इंग्रजी भाषा दिनाचा ऐतीहासिक आढावा घेत आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना इंग्रजी एक आव्हान म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. पायल परोपटे यांनी केले तर आभार कु. किरण कुयटे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. गजानन बी. माने व इंग्लिश लिटररी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©