Breaking News महाराष्ट्र सामाजिक

दहेगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या जीवाशी खेळ

 

उभ्या असलेल्या मालगाड्याच्या खालून रेल्वे प्रवाशांना करावे लागते येणे जाणे

या जीवघेणे प्रकाराकडे मात्र होत आहे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

देवळी तालुक्यालगत असलेले दहेगाव स्टेशन या गावात इंग्रजांच्या काळापासून रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन फार जुने असल्यामुळे देवळी तालुक्यातील सगळ्यात जवळ असलेले हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे येथे पॅसेंजर गाड्यांचा थांबा आहे येथून वर्धा भुसावळ,वर्धा अमरावती पॅसेंजर गाड्यांचे थांबे आहेत याच मार्गावरून विदर्भातील काशी समजल्या जाणाऱ्या शिर्डी व शेगाव तसेच अनेक धार्मिक स्थळे आहेत त्यामुळे देवळी तालुक्यातील भाविक भक्तगण या पॅसेंजर गाड्यांचा प्रवासाकरिता उपयोग घेत असतो.
या दहेगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची अतोनात गर्दी होत असते परंतु दहेगाव रेल्व स्टेशनवर दोन्ही बाजूंच्या फलाटवर(प्लॅटफॉर्म) मालगाड्या उभ्या असतात त्यामुळे रेल्वे प्रवाशांना फलाट वर उतरून त्या बंद माल गाड्यांच्या खालून जीव घेणी येणे जाने करावे लागतात त्यामध्ये वयोवृद्ध नागरिक,लहान मुलं,तसेच महिला,यांना बंदमाल गाड्या खालून ये जा करताना आतून त्रास सहन करावा लागतो.यामध्ये कोणतीही जिवीत हानी मोठी दुर्घटना घटण्याची शक्यता आहे.जर इथे कोणतीही मोठी जीवित हानी झाली तर याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार का असा प्रश्न तेथून प्रवास करणारे प्रवासी विचारत आहे.
याविषयी दहेगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर व्ही आर भाले याविषयी यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की आम्ही याविषयी लेखी स्वरूपात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे आणि आम्ही दहेगाव येथील ग्रामपंचायत ला सुद्धा सांगितले आहे की तुम्ही ठराव घेऊन रेल्वे प्रशासनाला पाठवा जेणेकरून या समस्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असे यांनी म्हटले आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे प्रवासांना होणाऱ्या समस्यांकडे लवकरात लवकर त्वरित लक्ष देऊन या समस्यावर तोडगा काढावा असे देवळी तालुक्यातील रेल्वे प्रवासी मागणी करीत आहे.

Copyright ©