प्रशासनिक सेवाव्रतींचा सत्कार सोहळा संपन्न,
स्वयंसेवी संस्थांनी दिला निरोप
गेल्या तीन ते चार वर्षापासून यवतमाळ शहरात, महसूल विभागांतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून श्री, ललित कुमार वऱ्हाडे व यवतमाळ तालुक्याचे तहसीलदार श्री, कुणाल झाल्टे यांच्या बदली प्रसंगी त्यांना यवतमाळ मधील सर्व सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने एका दिमाखदार सोहळ्यात भावपूर्ण निरोप देण्यात आला, तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी श्री अनिरुद्ध बक्षी यांचा सुध्दा नागरी सत्कार करण्यात आला.स्थानिक आर्णी रोड बायपासवर स्थित समर्थ प्राइड प्लाझाच्या सभागृहात 24 एप्रिल सोमवारला संध्याकाळी सात वाजता ह्या समारंभाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रमाकांत कोलते होते. विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रयासचे डॉ. विजय कावलकर हे सुद्धा उपस्थित होते,सोबतच अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार, श्री मनोज केदारे व्यासपीठावर होते,निरोपाच्या व सत्कार सोहळ्याच्या या भावपूर्ण कार्यक्रमासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात यवतमाळकरांची सेवा करणारे हे तिन्ही अधिकारी जनमानसात ठसा उमटवून गेले, पोलीस प्रशासन, नगर प्रशासन व वैद्यकीय क्षेत्राच्या व्यतिरिक्त महसूल विभागाच्या माध्यमातून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सामाजिक बांधिलकी जपत या अधिकाऱ्यांनी यवतमाळातील सर्व सामाजिक संस्था व संघटनांना सोबत घेऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व निरोप समारंभ घेण्यात आला. यवतमाळ शहराच्या इतिहासात प्रथमच सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार होणारा हा आगळावेगळा समारंभ होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री, राजेश गढीकर यांनी करून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका कथन केली. सामाजिक संस्थांच्या वतीने, अनेक मान्यवरांनी या तिन्ही विभूतींच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना आपली मनोगते व्यक्त केली. त्यात संकल्प फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, अनंत कौलगीकर,अनिल गायकवाड, चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने अरुण भाऊ पोबारू यांनी आपले विचार मांडले. तर विचार पिठावरून प्रमुख अतिथी म्हणून प्रयासचे डॉ. विजय कावलकर यांनी सत्कार मूर्तींच्या कार्याची उजळणी केली. सत्काराला उत्तर देताना, श्री, कुणाल झाल्टे यांनी आपल्या कारकिर्दीची माहिती उपस्थितांना दिली. उपविभागीय अधिकारी श्री, अनिरुद्ध बक्षी यांनी यवतमाळ शहरात काम करत असताना, शहरातील नागरिकांची जी साथ लाभली त्याचे भरभरून कौतुक केले. आपल्या काहीशा मिश्किल भाषणातून निवासी उपजिल्हाधिकारी श्री ललित कुमार वऱ्हाडे, यांनी हशा पिकवित उपस्थितांची मने जिंकली. यवतमाळातील कारकिर्दीचा लेखाजोखा हा जीवनभर लक्षात राहील, असे भावोदगार त्यांनी काढले. प्राध्यापक डॉ. रमाकांत कोलते यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून उत्तम सरकारी अधिकारी असणारे हे मान्यवर म्हणजे पहिल्यांदा उत्तम मनुष्य आहेत हे होय त्याशिवाय आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची उमेदच निर्माण झाली नसती.असे सांगितले. यवतमाळ शहरात असा कार्यक्रम घडणे म्हणजे सर्व सामाजिक संस्था व संघटनांची एकजुटीचा मेळ व ताकद ज्या व्यक्तींच्या हातात आहे असे सर्व सामाजिक संस्था व संघटनांचे समन्वयक प्रा. घन:श्याम दरणे, यांचा पाहुण्यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घन:श्याम दरणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रयासचे सचिव, मंगेश खुणे यांनी केले. सभागृहामध्ये घरातील अनेक सुजाण नागरिक व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होती, त्यात प्रामुख्याने डॉ. प्रकाश नंदुरकर, श्री सुरेश राठी, डॉ. अलोक गुप्ता, दीपक बागडी, राजू पडगिलवार, विमा अधिकारी श्री सुरजीत सिंग रावत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संकल्प फाउंडेशन च्या वतीने स्वादिष्ट भोजनाचा आनंद समस्त उपस्थितानी घेतला.ह्या समारंभाच्या यशस्वीते करिता शहरातील अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी आपले मोलाचे योगदान दिले. त्यात प्रामुख्याने, राजेश गढीकर, भाई अमन फ्रेंड्स ग्रुपचे, भाई अमन, संकल्प फाउंडेशन, वसुंधरा फाउंडेशन, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, धैर्य सोशल फाउंडेशन, आशुतोष पटवारी, प्रदीप ओमनवार, प्रयास यवतमाळ, डॉ. प्रशांत कसारे, सुहास धस, इनर व्हील क्लब ऑफ ज्वेल्स, नंददीप फाउंडेशन, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, घनश्याम बागडी, अस्तित्व फाउंडेशन, डॉ. स्वप्निल मानकर, राजेंद्र निमोदिया, मीनाक्षी सावळकर, अरसोड इंग्लिश क्लासेस, प्रियंका बिडकर, सेवा समर्पण प्रतिष्ठान, दुर्गा पटले, विजय बुंदेला, प्रतीक तळाळकर, ओलावा पशुप्रेमी ग्रुप, जाणीव एक हात मदतीचा ग्रुप, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, रिलायन्स फाउंडेशन इत्यादी सर्व संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती होती. उपरोक्त कार्यक्रमाकरिता समर्थ प्राइड प्लाझा चे सभागृह, संचालक श्री निलेश रोकडे उपलब्ध करून दिल्याबद्दल, आयोजकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले
Add Comment