यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे
भिंगरीत अडकत आहे शेतकरी व मजूर
भिंगरीचा खेळ शेतकरी व मजुरांच्या संसाराला लावत आहे ग्रहण
कॉटन मार्केट म्हणजे शेतकऱ्याची पंढरी असून प्रत्येक शेतकऱ्याना
येथील कॉटन मार्केट मध्ये यावाच लागते आपल्या शेतातील पीक निघालं की येथे येऊन विकाव लागते आणि हि बाब अवैद्य व्यावसायिकांस माहीत असल्याने त्यांचे दलाला शेतकऱ्यांना घेरून त्याला खेळण्या करीता प्रवृत्त करतात आणि हा खेळ एक दा की कुणी खेळायला सुरुवात केली की तो कंगाल होई पर्यंत खेळतच राहतो या खेळाकडे अनेकांचे आकर्षण वाढत जाते या
परिसरात मोठ्या प्रमाणात सट्टा मटका सुरु असून आल्या दिवसांत तेथे हि नवीन आकडा भिंगरी सुरु झालीअसून ती अनेकांना भुरळ घालत आहे या भिंगरीच्या चपेट मद्धे अनेक शेतकरी सापडत असून शेतकऱ्याच्या मालाचा पैसा घरी पोहचत नसून भिंगरी मधेच फिरत आहे.कॉटन मार्केट पासून उपविभागीय पोलीस अधिकार्याचे कार्यालंय हाकेच्या अंतरावर आहे.अगदी दोन पाऊल टाकले की कार्यालय इतकेच अंतर आहे.मात्र उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या छत्र छायेखाली जनु काही हा प्रकार सुरू असल्याचे जनसामान्यांन कडून बोलल्या जात.त्या मुळे तर ही भिंगरी सुरळीत फिरत आहे का?.असा सवाल करण्यात येत आहे .कॉटन मार्केटच नाही तर अप्सरा टॉकीज चौकातील मटक्याला हि मोठे अभय असल्याने खुले आम् मटका सुरू आहे हे सुध्दा जोतीष्याला विचारण्याची गरज राहिली नाही.या मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे अनेक परिवारात कलह निर्माण झाला असून प्रशासनाचे डोळे का उघडत नाही.असा सवाल सर्व सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
Add Comment