Breaking News महाराष्ट्र

देवळीत चोरटे सक्रिय १६ हजार किमती साहित्याची चोरी

देवळी ता.प्रतिनीधी:सागर झोरे

देवळीत चोरटे सक्रिय १६ हजार किमती साहित्याची चोरी

देवळी येथे वार्ड नं ७ येथील नगर परीषद लेआऊट देवळी येथिल प्रविण रामभाऊजी फटिंग यांच्या घरी किरायाने राहणारे सुनील रघुनाथ मडावी यांच्या घरी चोरट्याने चोरी करून एलई डी टिव्ही व महाग कंपनीच्या २ हॅन्ड वॉच शनिवारी चोरून नेल्या

मडावी हे पत्नी सोबत आरोग्य तपासनी करीता वर्धेला गेले होते वेळ जास्त झाल्यामुळे नातेवाईकडे मुक्काम केला.मडावी यांच्या घरी आंधार व दाराला कुलूप दिसल्याने चोरट्यानी या संधीचा फायदा घेऊन घराचे दाराची कडी तोडुन घरात प्रवेश केला १२ हजार एल ई टीव्ही व मनगटातील २ घड्याळातील किमत ४ हजार रुपये असे एकूण १६ हजार रुपये किंमतीच्या साहीत्यांची चोरी केली याबाबत किरायेदार सुनील मडावी यांनी पोलिसात तक्रार नोंदविली असून पूढील तपास देवळी पोलिस स्टेशन करीत आहे

Copyright ©