यवतमाळ सामाजिक

महात्मा बसवेश्वर जयंती हर्षौलासात साजरी

महात्मा बसवेश्वर जयंती हर्षौलासात साजरी

(मोटर सायकल रॅली आणि चित्ररथ ठरला आकर्षण,)

वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठाण,बसव क्लब,लिंगायत महिला मंडळ,यवतमाळ द्वारा आयोजीत जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१८ वा जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी महात्मा बसवेश्वर चौक येथून भव्य मोटर सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. लिंगायत समाजातील बांधव आणि भगिनी विशिष्ट पेहरावामध्ये या मोटर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ढोल नगाड्यासह शहराच्या विविध भागामध्ये फिरून ही रॅली महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथे विसर्जित झाली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला लिंगायत महिला मंडळाच्या जेष्ठ सदस्या सौ.स्मिता गिरीष गाढवे ह्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली,त्यानंतर मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर , मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.किशोर मांडगावकर , सचिव निलेश शेटे,सौ.शिल्पा बेगडे, सौ. कल्पना देशमुख, बाळासाहेब दिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सर्व समाजबांधव महात्मा बसवेश्वरांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मार्गस्थ झाले. दि.२१एप्रिला महात्मा बसवेश्वर भवन येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,तसेच सांयकाळी प्रसिद्ध नटसम्राट संजय माटे ह्यांचे महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग माझं काय चुकलयं?ह्याचे सादरीकरण करण्यात आले, संजय माटे ह्यांचे उत्कृष्ट अश्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले,तसेच महात्मा बसवेश्वरांचे जयंती ला

सायंकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे श्री गुरू कैलासलिंग महाराज,तळेगाव आणि वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर ह्यांचे हस्ते पुजन करून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली.शोभायात्रेमध्ये शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते,. शोभायात्रेमध्ये सर्वप्रथम वसुधा प्रतिष्ठानाचा महात्मा बसवेश्वरांचा अश्वधारी रथ हा देखावा व त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची भुमिका साकारणारे नटसम्राट संजय माटे आकर्षणाचे केन्द्र ठरले. तसेच कैलासलिंग महाराज अश्वरथामध्ये आसनस्थ होते,

शोभायात्रेला गणपती मंदिर येथून सुरुवात झाली.विविध चौकांमध्ये शोभायात्रेचे इतर समाजबांधवाच्या वतीने सुद्धा स्वागत

करण्यात आले.मार्गामध्ये गजानन हातगांवकर, गजानन हमदापुरे,ईश्वरी बेन्टेक्स, व बंडुभाऊ नांदेकर द्वारा ठिकठिकाणी बांधवासाठी थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली, शोभायात्रा महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आली असता चौकामध्ये शोभा यात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि रथावर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले. शोभायात्रा महात्मा गांधी चौक मार्गै महाविर भवन येथे आल्यानंतर वीरशैव हितसंवर्धक मंडळा द्वारा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण गुरू कैलासलिंग महाराज,तसेच मान्यवरांचे हस्ते करण्यात आले ह्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा ईत्यादी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले ह्या प्रसंगी बोलतांना कैलास लिंग महाराज म्हणाले.

जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे जनक महात्मा बसवेश्वर हे आहेत.१२ व्या शतकात स्त्री पुरुष समानतेकरिता त्यांनी फार मोलाचे काम केले आहे. समाजातील जातीभेद, वर्णभेद नष्ट करण्याचे कठीण असे काम महात्मा बसवेश्वरांनी फार अगोदरच केलेआहे. या शब्दांत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या

यशस्वी आयोजनाकरीता डॉ.जयेश हातगांवकर,डॉ. किशोर मांडगावकर,निलेश शेटे,भुषण तंबाखे,जयंत डोंगरे,गजानन हातगांवकर,रमेश केळकर,निर्मल ठोंबरे,विनोद नारिंगे,विजय देशमुख,

बाळासाहेब दिवे,सुरेश शेटे,सुधाकर केळकर,भाऊराव नांदेकर,महेश्वर गाढवे,सारंग गाढवे महेंद्र ठोंबरे,मंगेश शेटे,नागेश कुल्ली, राजु कुहेकार,

किनकर सर,अनिल बेगडे, अनिल हमदापुरे,मनिष शेटे, विनोद देशमुख, अजय खारपाटे, गजानन हातगांवकर,,संजय तोरकडी, गजानन बिल्लावार, डॉ.मंगेश हातगांवकर,

भैयासाहेब आजने,मंगेश चांदेकर,संजय परमा,गौरव दिवे, चिरायु

हातगांवकर, प्रकाश देमापुरे, गजानन हमदापुरे,संदिप रामापुरे, कैलास ठोंबरे,संजय खारपाटे, प्रकाश शेटे, सचिन शेटे, अशोक जिवरकर, सचिन मिरासे,मधुकर ठोंबरे,

ओमेश हातगांकर,निलेश चांदेकर, विनय भुरे,अभय भुरे , अथर्व हातगांवकर,प्रकाश मिरासे,राजेंद्र मेनकुदळे, मंगेश मानेकर,राजेद्र उमरे ,राजेश मानेकर,उमेश चांदेकर,आशिष रेवडी,मंगेश मानेकर,मनोज गाढवे,प्रशांत शेटे,महादेव जवसकर,संजय ठोंबरे,चिरायु हातगांवकर, संजय नेमाडे,नितिन गुळकरी, प्रविण मिरासे,सुरेश महाजन,अमोल रेवणशेटे, सुयश शेटे,अशोक तेले,रूद्र ठोंबरे,मनोज नवदुर्गे,सौ.शिल्पा बेगडे,,सौ. पद्मश्री हातगांवकर सौ. तेजश्री मानेकर,सौ.उषा कोचे,

सौ.सुवर्णा निकडे, सौ. सिमा केळकर, सौ. प्रांजला ठोंबरे,सौ.स्वाती हातगांवकर,सौ.आश्विनी हातगांवकर

, श्रीमती लिना चांभारे,सौ.राधिका मांडगावकर, सौ.विद्या बेलोरकर,

सौ. रश्मी अंदुरकर, सौ.रेणुका कुल्ली,श्रीमती मंदा दंडगे,सौ. शुभांगी हातगांवकर इत्यादींचे

सहकार्य लाभले तसेच वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान,बसव क्लब,लिंगायत महिला मंडळ, लिंगायत गवळी समाज,लिंगायत जंगम समाज,लिंगायत

बुरड समाज,इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©