यवतमाळ सामाजिक

धाम नदी पात्रातून रेतीची अवैध उचल

वर्धा प्रतिनिधी:सागर झोरे

धाम नदी पात्रातून रेतीची अवैध उचल

नदी बचाव अभियानाचा उडतो फज्जा

पोलिस प्रशासनसह जिल्हा प्रशासनाची डोळेझाक खुले आम् तस्करी

पवनार नागपूर महामार्गावरील पुलाजवळ धाम नदी पात्रातून रेतीची दिवसा ढवळ्या अवैध उचल होत मात्र या कडे पोलिस प्रशासन महसूल विभाग तथा जिल्हा प्रशासन जाणीव पूर्वक डोळेझाक करीत असल्याची ओरड नागरिक करत आहे.

जिल्ह्यात सद्या नदी बचाव अभियानाचा मोठा गाजावाजा सुरू आहे तर दुसरीकडे होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यात यावा अशी ओरड जिल्हा प्रशासन करत आहे मात्र वास्तव काही वेगळेच असून

दिवसा ढवळ्या ठीक ठिकाणी धाम नदी पात्रातून रेतीचा उपसा अवैध उपसा करून खाजगी चारचाकी वाहन ॲपे ट्रॅक्टर याच्या सहायाने परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे एक ॲपेची किंमत १५००रुपये चार चाकीने दिल्यास २२०० रुपये तर ट्रॅक्टरने विकल्यास ७ ते ८ हजार रुपये दराने विक्री होत आहे.

उन्हाळा सुरू होताच घरांचे बांधकाम सुरू होते.

जिल्यातील रेती घाटांचा लिलाव होत नसून शासनाच्या वतीने ६०० रुपये ब्रास प्रमाणे रेती देण्याचा शासनाच्या वतीने निर्णय जाहीर करण्यात आला मात्र अद्याप पर्यंत निर्णय अमलात आला असल्याने घराचे बांधकाम करण्यास नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून पर्यायी व्यवस्था मन्हून

गावातीलच धाम नदी पात्रातून रेतीची उचल होत असलेल्या कामगारांच्या मदतीतून रेतीची खरेदी केली जात आहे. यात मजुरांना मोठी मिळकत मिळत आहे तर तिकडे ट्रॅक्टर चालकांना भाडे मिळत आहे.मात्र यात नदी सवनर्धनाचे काय ? नदी बचाव अभियान केवळ कागदोपत्रीच आहे का? जिल्यातील इतर तहसिल कडून मोठी कारवाई होत आहे मग इथे का नाही? दिवसा ढवळ्या रेतीचा अवैध उपसा होत आहे तरीही कारवाई का केली जात नाही असे संतप्त प्रश्न चिन्ह नागरिक निर्माण करू लागले आहे   रेतीची अवैध उपसा करून जिल्हा प्रशासनाचा वाळू माफिया कर बुडवत आहे आपला पोटोबा भरावा या करीता नदी पात्रात जागोजागी खडे तयार करून पर्यावरणाला चोरटे हानी पोहचवत आहे या वरून विचारणा केल्यास आमच्या हाताला काम नाही त्या मुळे रेतीची उचल करून आम्ही आमच्या परिवाराचा यावर उदरनिर्वाह करत असल्याचं मजूर बोलत आहे तर ट्रॅकर मालक आम्ही महिने बांधले आहे तुला कुणाला सांगायचं आहे ते सांग आमचं कुणी काही वाकड करू शकत नाही अशी बतावणी करत रात्री १२ नंतर रेतीची घरपोच सुविधा देत आहे  या मुळे महिने बांधले तरी कुणाचे असा असा प्रश्न उपस्थित होत आहे परिसरात यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने वाळू माफियानचे चांगलेच फावते पावत असून  वारंवार तक्रारी होत असून सुधा दिवसा ढवळ्या रेतीची अवैध उचल होत असल्याने वाळू माफियांची हिम्मत बळावत चालली आहे त्या मुळे जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासन कारवाई करणार का ?दिवसा ढवळ्या नदीतून रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याने नदी बचाव अभियानाचा फज्जा उडत असल्याचं चित्र दिसून येत आहे

कारवाई होणार तरी कधी ? असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहे.

Copyright ©