यवतमाळ सामाजिक

शिक्षकच उद्याचे भविष्य घडऊ शकतो,आणि हा पुरस्कार त्याच्या कार्य क्षमतेची पावती आहे. जिल्हा अधिकारी अमोल येडगे

शिक्षकच उद्याचे भविष्य घडऊ शकतो,आणि हा पुरस्कार त्याच्या कार्य क्षमतेची पावती आहे. जिल्हा अधिकारी अमोल येडगे

नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला या वेळी पुरस्कार प्राप्त शिक्षका ना मार्गदर्शन करताना जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शन करीत शिक्षकच उद्याचे भविष्य घडऊ शकतो,आणि हा पुरस्कार त्याच्या कार्य क्षमतेची पावती आहे. प्रत्येकानी विद्यार्थ्याना पोट तिडकिने शिकविल्यास प्रत्येक विद्यार्थी देशाचा आधार बनू शकतो,हा पुरस्कार मिळाला म्हणजे त्या शिक्षकाची जवाबदारी संपली असे नाही तर दुप्पट जवाबदारी वाढत असून त्यांनी इतरांनाही आदर्श शिक्षक कसे बनता येईल या कडे इतर शिक्षकांना प्रेरित करावे असे मार्गदर्शन येडगे यांनी केले तर मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.श्री कृष्ण पांचाळ यांनी शिक्षक कसा असावा आपली विद्यार्थ्यानं प्रती असलेली निष्ठा जोपासली पाहिजे शिक्षकच देशाचा पाया मजबूत करण्यासाठी पाहिले पाऊल आहे,प्रत्येकानी आपले कर्तव्य अंगिकारून कार्यकेल्यास प्रत्येक क्षेत्र हे अग्रेसर बनविण्याची क्षमता या शिक्षकांमध्ये आहे या भव्य दिव्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात श्रीमती शारदा महल्ले ( भेंडे) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महल्ले यांनी प्रत्येक विषयात विद्यार्थ्याना यथोचित घेडविण्याचा प्रयत्न केला सावंस्कृत,कला,अभिनय,प्रत्येक स्पर्धा त्यांच्या कला गुणांना वाव देत एका पालक तर दुसऱ्या बाजूला शिक्षक म्हणून विद्यार्थ्याना घडविण्याचे कार्य केले याचेच फळ आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले या वेळी मा.जिल्हा अधिकारी अमोल येडगे जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पीयूष चव्हाण,कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे,प्राथमिक शिक्षण अधिकारी किशोर पागोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©