महाराष्ट्र सामाजिक

हिंदू-मुस्लिम एकता भारतीय लोकशाहीचे सौंदर्य.- किरण ठाकरे

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

हिंदू-मुस्लिम एकता भारतीय लोकशाहीचे सौंदर्य.- किरण ठाकरे

युवा संघर्ष मोर्चा ने केले इफ्तार पार्टीचे आयोजन.

पवित्र रमजान च्या महिन्याचे औचित्य साधून युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य लढ्या पासून तर आजतागायत देवळी शहराच्या जडणघडणीत मुस्लिम बांधवांचा मोलाचा वाटा राहिला आहे.देवळी शहर हे सामाजिक ऐक्याचे उदाहरण आहे.हिंदू-मुस्लिम बांधवां सह सर्व धर्मिय बांधवांचा सामाजिक सलोखा देवळी शहरातील प्रत्येक पिढीने जपला आहे.परंतु सध्याच्या सांप्रदायिक घटना बघता ही सामाजिक एकता टीकविण्याची जबाबदारी आता आपल्या नवीन पिढीची असल्याचे यावेळी किरण ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले.सामाजिक एकता हाच उद्देश ठेऊन आजच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.देवळीतील जामा मस्जिद व मस्जिद-ए-मोहम्मदिया चे इमामसाहब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इमामसाहेबांनी इफ्तार पार्टीत सहभागी होऊन उपस्थितांना अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले.यावेळी आसिफ शेख यांनी संचालन केले. इफ्तार पार्टीच्या आयोजन बाबत मुस्लिम बांधवांनी युवा संघर्ष मोर्चाचे अभिनंदन करीत आभार मानले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या मंचावर अयुब अली पटेल,सत्तार खा पठाण, जब्बारभाई तंवर, हबीबभाई पठाण, शफीभाई ठेकेदार,गौतम पोपटकर यांच्या सह प्रविण कात्रे, आसिफ शेख,मनोज नागपुरे,मनीष पेटकर,प्रविण तराळे,सुरज रॉय,सुरज सावरकर,श्रीकांत सराटे,राजेश कांबळे,नदीम शेख,भारत कुकडे, गौरव खोपाळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाकरिता हमीदभाई तंवर, सत्तार शेख, हारूण तंवर,अब्दुल नईम,जमील भाई सलीम कुरेशी, शारीक कुरेशी,निसार भाई, हमीद शहा,परवेज पटेल,मिराण पटेल, अशरफ तंवर, करीम शहा, अझहर अहमद ,सोहेल शहा,जावेद,इमरान शेख व हिंदू- मुस्लिम बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©