यवतमाळ सामाजिक

सुनिल चव्हाण यांचा सन्मान

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान

सुनिल चव्हाण यांचा सन्मान

विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणी देवस्थान यांचे वतीने मौजा केळझरा कोमटी तह.आर्णी येथे विदर्भ स्तरीय एकल व समूह सिने नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच सांस्कृतिक कला आणि नाटय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मामा मरगडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल भाऊ आडे मा. न. अध्यक्ष सुनिल भारती , विलास पाटील राऊत, रत्न दीप पवार सरपंच हे होते.पाहुणे मंडळी च्या हस्ते सुनिल रामचंद्र चव्हाण रा माळेगांव तह .आर्णी जी.यवतमाळ यांचा शाल.श्रीफळ. स्मुर्ती चिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरुष च्या आवाजात गीते गाऊन वाह वाह मिळवली.कार्यक्रमाचे आयोजन लावकुश आडे व आकाश राठोड यांनी केले होते तर कार्यक्रमाचे मुख्य सूत्र धार चंदू राठोड हे होते या वेळी बरीच रसिक मंडळी तथा गावकरी मंडळी हजर होती

Copyright ©