यवतमाळ सामाजिक

दिग्रस परिसरातील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळा

दिग्रस परिसरातील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळा

विद्यार्थी हित संवर्धन कृती समितीचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लाईट ऑफ लाइफ नामक संस्थेचे पाटील नगर, दिग्रस येथे कार्यालय असून ते अवैधरित्या परिसरात शैक्षणिक संस्थेमध्ये जाऊन वर्ग घेत आहे. वर्ग घेण्याकरिता प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक या संस्थेकडे नाहीत. तरी सुद्धा स्थानिक शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी दत्तक घेण्याचे आमिष दाखवून वर्ग चालविल्या जाते. अशा वर्गात अंधश्रद्धा व खोटे प्रलोभणे विद्यार्थ्यांना दिली जातात. त्यामुळे दिग्रस परिसरातील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी विद्यार्थी हित संवर्धन कृती समिती, दिग्रसच्या वतीने गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

 

या वर्गाच्या फोटोच्या आणि मुख्याध्यापकांचे शिफारसपत्र, प्रशस्तीपत्र यांचा आधार घेऊन समाजातील मोठ- मोठ्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात रोख व वस्तुस्वरूपात देणगी गोळा केला जाते. खोटी बिले जोडून रोख रकमेचा अपहार केला जातो आणि देणगी स्वरूपात मिळालेल्या वस्तू विद्यार्थ्यांना काहींना मोफत व काहींना नगदी स्वरूपात विकले जातात. यामुळे समाजात शिक्षण विभाग, शासनाप्रत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे. ही बाब विद्यार्थी हिताचे दृष्टीने नुकसानकारक आहे. सदर अपहार व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी कृती उपरोक्त संस्था करीत आहे. तरी सदर संस्थेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे हित जोपासावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर अमोल सराफ, कल्पना पवार, गोपाल पारधी, महादेवराव सुपारे, रितेश उबाळे, शिल्पा खंडारे, प्रमोद बनगिनवार, मनोज राठोड, अनिल भरारे, मनोज सरवैय्या, सुशील जोशी, सदानंद जाधव, विक्रम जाधव, बाळासाहेब आंबेकर, शुभम ढोले, श्याम लोखंडे, दत्तात्रय बनगिनवार, अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारखी, राहुल देशपांडे, दिनेश सुकोडे, शुभम गावंडे, अतुल नाटकर, तुषार खिंची, सौरभ पधरे, प्रेम पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Copyright ©