महाराष्ट्र सामाजिक

मारहाण करून लुटमार करणार्या टोळी जेरबंद सेवाग्राम पोलिसांची कामगिरी

देवळी वर्धा प्रतिनिधी:सागर झोरे 

मारहाण करून लुटमार करणार्या टोळी जेरबंद सेवाग्राम पोलिसांची कामगिरी

पवनार सेवाग्राम रोड 18एप्रिल रोजी रात्री 9: 30 वाजताच्या सुमारास एका डॉक्टरसह पवनार येथील तीन युवकांना चाकूने मारहाण करून गंभीर जखमी करत लुटमार करणार्या टोळीस सेवाग्राम पोलिसांनी 24 तासाच्या आत पकडुन अटक केली त्या मुळे गावातील नागरिक सेवाग्राम पोलिसांचे धन्यवाद देत आनंद व्यक्त करत आहे.

मारहाण करून लुटमार करणारी टोळी हि वर्ध्यातीलच असल्याचं संशय पोलिसानं कडून व्यक्त केला जात होता.

यात सात आरोपी पैकी पाच आरोपी अठरा वर्षां खालील असून दोन आरोपींची नावे पोलिस प्रशासना कडून समोर आली आहे यात राहुल दादाराव जाधव वय 19 वर्षे रा. वडर वस्ती आर्वी नाका वर्धा तर दुसरा अर्जुंसिग संतोषसिंग बावरी वय 19 वर्षे रा. गिटिखदान शीख बेडा सावंगी मेघे वर्धा.अशी आरोपींची नावे असून पाच आरोपी यांना बाल सुधार गृहात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासना कडून सांगण्यात येत आहे.

18 एप्रिल रोजी 8: वाजता डॉ करन वांदिले हॉस्पिटलचे काम आटोपून सेलू इथे जात असता यांना वाटेत अडवून हा रस्ता कुठे जातो अशी विचारणा करत जवळील पैसे दे नाहीतर मारील अशी धमकी देत चोरट्यांनी वांदीले यांच्या जवळून सहा हजार रुपये बळजबरीने काढून जवळील सोने हिसकावण्याचा प्रयत्न होता परंतु डॉ वांदीले यांनी आपला जीव वाचवत वावरानी पळ काढत वरूड गाठले

त्या नंतर पवनार येथील तीन युवक सेवाग्राम येथील उमाटे यांच्या बॉटल कंपनीत कामावर जात असता 9 :30 वाजता यांनाही वाटेत अडवून सचिन येरूंकर यांच्या मांडीवर चाकूने तीन वार करत सात हजार रुपये लुटून गंभीर जखमी केले तर रोशन बुरबादे यांना मारहाण करून केली.

व गौरव बोबडे यांचा एक्स प्रो कंपनीचा मोबाईल किंमत पंधरा हजार हिसकावत चोरटे पसार झाले

दुसऱ्या दिवशीही बेतला प्लॅन

18 एप्रिल रोजी प्रमाणे 19एप्रिल रोजीहि चोरट्यांनी प्लॅन आखला

पवनार येथील युवक अनिल लाडे

याला वाटेत अडवून पैसे मागितले परंतु लाडे यांनी धका देत तेथून पळ काढत पवनार गाठत सर्व आपबिती ग्रामस्थांना सांगितली

त्या प्रमाणे वरूड व पवनार येथील ग्रामस्थांनी दोन्ही बाजूंनी घटना स्थली धाव घेत चोरट्यांना चांगला चोप देत पोलिसांना घटनेची माहिती देत पाचारण केले पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या नेतृत्वात सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार चकाते पियस आय राहुल इटेकर संजय लोहकरे व इतर कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेत चोरट्यांना ताब्यात घेतले या वेळी पवनार व वरूड गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याने पोलिस प्रशासना कडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चोरटे राहुल जाधव व अर्जुंसिग बावरी यांच्यावर भा. द.वी.कलम 394/397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सेवाग्राम पोलिस करत आहे.

Copyright ©