यवतमाळ सामाजिक

वित्तीय साक्षरता व समावेशन चा गावागावात उपक्रम,

वित्तीय साक्षरता व समावेशन चा गावागावात उपक्रम,

क्रिशील फाउंडेशन व भारतीय रिजर्व बँक , बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून जनजागृती व प्रत्येक्ष लोकांना लाभ

गडचांदूर: आज दिनांक 18/04/2023 व 19/04/2023 रोज मंगळवार,बुधवार ला राजुरा, तालुक्यातील कोलगाव, कोरपना तालुक्यातील कोठोडा बु येथे क्रिसिल फाउंडेशन च्या सहकार्याने ,भारतीय रिझर्व बँक च्या तत्वाखाली व बँक ऑफ इंडिया च्या मार्गदर्शनाखाली वित्तीय साक्षरता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा,आर्थिक नियोजन, सोशल सेक्युरिटी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,सुकन्या समृध्दी योजना, अटल पेन्शन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना , बँकिंग लोकपाल या विविध शासकीय योजनां संबंधी गावातील लोकांना माहिती सांगण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले, गावातील नागरिकांचे शासकिय योजनांमध्ये समावेशन करण्यात आले. सेंटर फॉर फिनान्सियल लिटरन्सी (CFL) जिवती द्वारे लोकांमध्ये राजुरा, कोरपना, जिवती या ठिकाणी, वित्तीय साक्षरता अभियान घडवून आणण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला कोलगाव या गावातील प्रमुख पाहुणे माननिय सरपंच साहेब सौ. अनिता सुधाकर पिंपळकर, उपसरपंच श्री पुरुषोत्तम रामदास लांडे, अक्षय निब्रड ग्राम सदस्य, शंकर पासपुते ग्राम सदस्य, सौ चंद्रकला पेटकर(ICRP), शिपाई बंडुजी झुंगरे व तसेच कोरपना तालुक्यातील ग्राम पंचायत कोठाडा बु येथे झालेल्या कँप मध्ये प्रमुख पाहुणे ग्राम पंचायत कोठोडा या गावचे सरपंच, रमेश मेश्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सबीर शेख, ICRP अनिता तोडे, CFL सेंटर म्यानेजर अतुल गोरे सर राजुरा तालुका सम्वयक आकाश मेश्राम, कोरपना तालुका सम्वयक आरती आडकीने व बँक ऑफ इंडिया राजुरा चे BC आदेश धोटे सर , कोरपना येथील BC रणदिवे सर , गांवकरी महिला व पुरुष यांची उपस्थित होती, गावातील लोकांना बँक व पोस्ट ऑफिस मधून मिळणाऱ्या शासकीय योजना, बॅंकेतून मिळणाऱ्या सेवा सुविधा या बाबत मार्गदर्शन करण्यात आले, व त्याना योजनांनाध्ये समाविष्ट करण्यात आले, गावा मध्ये वित्तीय साक्षरता ची समिती स्थापन करण्यात आली, व नागरिकांना प्रत्यक्ष लाभ व माहिती देण्यात आली,

Copyright ©