यवतमाळ राजकीय

आम् आदमी पार्टी च्या विविध शाखा स्थापन

आम् आदमी पार्टी च्या विविध शाखा स्थापन

आम् आदमी पार्टी च्या विविध गावात शाखा स्थापन करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

आम आदमी पार्टी चा भारत देशात झपाट्याने प्रसार होत आहे. पार्टी चे राष्ट्रीय संयोजक अरविंदजी केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये सरकार बनवण्यात यशस्वी झाली असून पार्टी ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला. पार्टी चे महाराष्ट्राचे संयोजक रंगाभाऊ राचुरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुद्धा आम आदमी पार्टी चा पाया मजबूत होत आहे. आज दि 19 एप्रिल 2023 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील, तालुका स्तरावरील ग्राम पातळीवरील पारवा, तळेगाव ( भारी ), खानगाव, कार्ली, शरद या पाच गावी शाखा उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम यवतमाळ तालुका संयोजक मोबीन शेख यांच्या नेतृत्वात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी पार्टी चे पश्चिम विदर्भाचे सहसंयोजक भाई अमन यांच्या हस्ते शाखेचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्ह्याच्या महिला संयोजक सौ सुनंदाताई साखरकर, यवतमाळ शहर संयोजक गुणवंतराव इंदूरकर, यवतमाळ जिल्हा कोषाध्यक्ष विलासराव वाडे, डॉ. गणेश नाईक, यवतमाळ तालुका सहसंयोजक फजरूल खान, यवतमाळ तालुका सचिव कविश्वर पेंदोर, तालुका महिला सचिव अरेफा खान, तालुका आदिवासी समाज प्रमुख बाबाराव कुमरे, तालुका युवा संयोजक नजूल सोयाम, तालुका सदस्य विनोद जामकर, सुभाष पाडसेनेकून, शहर संघटक गोपाल गावंडे, शहर आदिवासी समाज प्रमुख शत्रुघनजी आडे, युवा आघाडीचे जिल्हा संयोजक आकाश चमेडिया, युवा आघाडीचे सहसचिव जावेद शेख, श्री अविनाशजी धनेवार, नितीन मंत्रिवार, अमोल भोयर, प्रफुल तोडासे, विक्की शेंडे, आकाश शेंडे, आकाश शिवारे, कांताताई मेश्राम, वर्षा रामटेके, विलास वाळके, प्रकाश मेश्राम हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©