Breaking News महाराष्ट्र

सात अज्ञात हलेखोरां कडून पवनार येथील तीन युवकांवर प्राणघातक हल्ला

वर्धा प्रतिनिधी पंकज तडस

सात अज्ञात हलेखोरां कडून पवनार येथील तीन युवकांवर प्राणघातक हल्ला

वरूड शेतशिवारा तील घटना परिसरात भीतीचे वातावरण

अज्ञात सात हल्लेखोरां कडून पवनार येथील तीन युवकांवर दि. 18 एप्रिल च्या रात्री ठीक 9 ते 9: 30 वाजता च्या सुमारास प्राणघातक हल्ला करत मांडीवर धारदार चाकूने वार करून मारहाण करीत लुटमार करण्यात आली हि घटना 18 एप्रिल रोजी रात्री 9: 30 वाजताच्या दरम्यान पवनार वरूड रोडवर धर्मराज खेलकर यांच्या शेताजवळ घडली प्राप्त माहितीनुसार

पवनार येथील सचिन मनोहर येरुंनकर वय 30 वर्षे रितेश श्रावण बुरबादे वय 20 वर्षे व गौरव महेंद्र बोबडे वय 22 वर्षे तिघेही नेहमी प्रमाणे सेवाग्राम येथील एमआयडीसी मधील मिनरल वॉटर बॉटल कंपनीत कामावर रात्रीपाळी ला जात असता अज्ञात सात हल्ले खोर इसमानी सचिन येरुंकर यांच्या मांडीवर धारदार चाकूने तीन वार केले तर बाजूला असलेल्या मुरमाचे मोठे दगड उचलून डोक्यावर मारले यात सचिन येरूनकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जवळील बळजबरी करत सात हजार रुपयाची नगदी रोकड हिसकावून घेतली

हलेखोर एवढ्यावरच न थांबता गौरव बोबडे याच्या जवळील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेत गौरव याच्या हाताच्या बोटावर धारदार शस्त्राने वार करत जखमी करून रितेश बुरबादे याला हि मारहाण केली. रितेश बुरबादे ला मारहाणीत काना ला गंभीर स्वरूपाची इजा करून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला परंतु रितेश याने जवळील मोबाईल बाजुला फेकून दिल्याने त्याच्या जवळून काहीच मिळाले नसल्याचं सांगण्यात आले.

यात सातहि हलेखोर दोन दुचाकीवर आले असून यात एक काळ्या कलरची स्प्लेंडर व पांढऱ्या कलरची मोपेड गाडीने असल्याचं तक्रार कर्त्याकडुन सांगितल्या जात आहे. या आधी त्याच दिवशी रात्री 8 वाजून 30 वाजता सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी मेडिकल कॉलेज चे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ किरण वांदीले रा. सेलू यांना अडवून त्यांच्या जवळील सहा हजार रुपये लुटल्याची घटना समोर आली यात एक मुलगा मराठी भाषेत बोलत असून उर्वरित सहा इसम हिंदी भाषेत ग्यांगस्टर वाणी अनुवाद करून शिवीगाळ करीत होते.

सात हि इसमांच्या तोंडातून दारू व गांज्याचा वास येत असल्याने, नक्की सदर हल्लेखोर इसम हे जवळपास परिसरा तीलच असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे .

 

सात ही हल्लेखोर व्यक्कतीनी मारहाण करत लुटमार करून पवनार कडे आपल्या दुचाकीने पळ काढला.

तत्काळ हल्यात गंभीर जखमी तीनही युवकांनी सेवाग्राम पोलिस ठाणे गाठून घटनेची नोंद करण्यात आली.

अज्ञात सातही इसमान विरुद्ध घटनेच्या भा.द.वी. च्या कलम 394,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तत्काळ सेवाग्राम पोलिसानी घटनेची चौकशी सुरू करत घटना स्थळी वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार चकाटे,

पी एस आय राहुल इटेकार, धाव घेत रात्री उशिरा पर्यंत परिसर पिंजून काढत शोधा शोध सुरू होती मात्र अद्याप पर्यंत आरोपींचा सुगावा लागला नाही. अधिक तपास सेवाग्राम पोलिस करत आहे.

सेवाग्राम रोडचे काम सुरू असल्याने रोड खराब झाला त्यामुळे बरेच नागरिक पवनार वरूड रोडने अवागमन करतात

रोडने उजेडाच्या कुठल्याच सुविधा नसल्याने अंधाराचा फायदा घेत हलेखोर लुटमार करून पसार होण्यात यशस्वी होत आहे.

या आधीही बऱ्याचदा अश्या घटना घडल्या आहे परंतु पोलिस तक्रार करण्यात आली नसल्याने लुटमार करणाऱ्या टोळींचे

चांगलेच फावते पावत आहे. पोलिस प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे शेतकरी संतोष हिवरे

सेवाग्राम रोडवरील बोगदाही जीवघेणा ठरत आहे  रोडवर तसेच बोगद्या जवळ पूर्ण पने काळोख राहतो शिवाय रात्री 9 नंतर दळणवळण कमी होते त्या मुळे शाॅट कट मार्ग निवडत वरूड सुरक्षित मार्ग म्हणून या रोड नी अवागमन केल्या जाते मात्र या रोडने ही लुटमार होऊ लागण्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने या कडे गांभीर्य पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे जगदीशराव वाघमारे माजी उपसरपंच पवनार.

परिसरात होत असलेल्या घटना चिंताजणक असून होत असलेल्या घटना परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आहे. अशीच घटना दि.06 एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी याच पवनार वरूड मार्गावर पवनार येथील रहिवाशी

नंदकिशोर कृष्णाजी सोंनटक्के यांना वरूड मार्गावरील धाम नदी प्रकल्पाच्या कालवा पुला खाली अडवून लुटमार करण्यात आली होती. या बाबत मात्र नंदकिशोर कृष्णाजी सोनटक्के रा पवनार यांनी सेवाग्राम पोलीस स्टेशन ला तक्रार करण्यात आली नसल्याने लुटमार करण्याऱ्या टोळीची हिमत बळावत चालली आहे.

पोलिस प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष देत लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे.

राजेंद्र सोनटक्के पवनार ग्रामस्थ.

Copyright ©