यवतमाळ राजकीय

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ज्ञ स्वीकृत संचालक पदी मनोज जयस्वाल,मोहन राठोड यांची निवड.  

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ज्ञ स्वीकृत संचालक पदी मनोज जयस्वाल,मोहन राठोड यांची निवड

यवतमाळ : येथील जिल्हा बँकेत सोमवारी संचालक मंडळात दोन स्वीकृत सदस्यांची निवड होती.या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बसली. सर्वसमावेशक चर्चेतून ही निवड करण्यात आली.राज्याच्या राजकीय पटलावर सहकार वर्तुळाचा केंद्रबिंदू ठरेल, अशा आशयाची ही बैठक झाली. दोन तज्ज्ञ स्वीकृत संचालकांची निवड करण्याचा हा मुद्दा होता. त्यासाठी संचालक मंडळाने विशेष सभा आयोजित केली होती.मनीष पाटील यांनी मोहन राठोड व मनोज जयस्वाल यांच्या तज्ज्ञ स्वीकृत संचालकासाठी हात वर करून १५ संचालकांनी संमती दर्शविली तर अध्यक्ष टिकाराम कोंगारे यांनी सुद्धा दोन्ही नावांना पाठिंबा असल्याचे सांगितल.तसेच या दोन्ही नावाला पाठिंबा असल्याचे मनीष उत्तमराव पाटील यांनी १५ संचालकांची स्वाक्षरी असलेले पत्र थेट अध्यक्षांना सुपूर्द केले. जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी तज्ज्ञ स्वीकृत संचालकांची नावे जाहीर केली. विद्यमान पालकमंत्री संजय राठोड यांचे काका मोहन राठोड आणि मनोज जयस्वाल या दोघांची स्वीकृत तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा विद्यमान अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केली. तज्ज्ञ

स्वीकृत संचालक पदी निवड झालेले मनोज मोहनलालजी जयस्वाल हे दैनिक सिंहझेपचे संपादक असून ते दिवंगत उत्तमरावदादा पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहे.मनोज मोहनलालजी जयस्वाल यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दांडगा अनुभव आहे.मनोज जयस्वाल यांनी तज्ञ स्वीकृत संचालक निवड झाल्याबद्दल मनोहरराव नाईक,

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड ,माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे,बाळु धानोरकर,वसंतराव पुरके,संध्याताई सव्वालाखे, देवानंद पवार,जावेद अन्सारी,प्रवीण देशमुख,प्रफुल्ल मानकर,मनीष पाटील, टिकाराम कोंगरे,वसंतराव घुईखेडकर,बाळासाहेब मांगुळकर,बाळासाहेब कामारकर,अशोकराव बोबडे,अरुण राऊत,चंदू चौधरी तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व आदींचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.

Copyright ©