यवतमाळ सामाजिक

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 11 एप्रिल जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 11 एप्रिल जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन

जोतीबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळच्या वतीने महाराष्ट्राचे माजी सामान्य प्रशासन मंत्री आमदार मदनभाऊ येरावार यांना निवेदन देऊन करण्यात आली. 11 एप्रिल महात्मा जोतीराव फुले यांची जयंती महाराष्ट्रात बरोबर भारतभर साजरी करण्यात येते. त्या निमित्ताने महाराष्ट्रात 11 एप्रिल ला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागणीचे निवेदन माजी मंत्री मदनभाऊ येरावार यांना मंडळाच्या वतीने देण्यात आली .यावेळेस मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट अरुणराव मेत्रे, सचिव संजय येवतकर ,उपाध्यक्ष मनोज पाचघरे ,कोषाध्यक्ष महेंद्र पिसे ,पांडुरंग दिडपाये, भाजप शहर अध्यक्ष उषाताई खटे, अशोकराव तीखे, संजय कावलकर उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने अध्यक्ष एडवोकेट अरुणराव मेत्रे व सचिव संजय येवतकर यांनी आमदार महोदयांना भूमिका सांगितली. यावेळी माननीय आमदार मदनभाऊ येरावार यांनी भूमिका समजून घेतली. तसेच मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पत्राची प्रत देण्यात आली. आमदार महोदयांनी सर्व बाजू ऐकून घेतली व यावर पत्रव्यवहार करून उचित कार्यवाही केल्या जाईल असे माननीय आमदार मदनभाऊ येरावार यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.अशी माहिती मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.अतुलकुमार सारडे यांनी कळविले

Copyright ©