यवतमाळ सामाजिक

गोधनीरोड वरील आगग्रस्त कुटुंबाला अस्तित्व फाउंडेशनची मदत

गोधनीरोड वरील आगग्रस्त कुटुंबाला अस्तित्व फाउंडेशनची मदत

यवतमाळ -: शहरालगत असलेल्या उमरसरा परिसरातील गोधनी मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागून त्यामध्ये तीन घर भस्मसात झाले होते.

यामध्ये प्रामुख्याने राठोड यांचा ऑटो,घरातील फ्रीज, कलर टीव्ही, दोन सिलेंडर व रोख 1 लाख 50 हजार रुपये जळून राख झाले तसेच बाजूच्या दोन्ही घरातील संसार उपयोगी वस्तूंसह साहित्याचे मोठे नुकसान झाले.

या गंभीर घटनेची दखल घेत अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष सौ अलका विनोद कोथळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन संबंधित कुटुंबाकडून माहिती घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले यानंतर त्यांनी आपल्या फाउंडेशन मध्ये हा घटनाक्रम सांगून मदतीची आवाहन केले या आव्हानाला अस्तित्व फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रतिसाद देत त्या कुटुंबाला भरभरून मदत करण्याची ठरविले या अनुषंगाने आगग्रस्त कुटुंबाला सहा महिने पुरेल ईतर धान्य, महिला मुली व पुरुषांचे कपडे तसेच स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले भांडे यासह जीवनावश्यक वस्तू असे सहा महिने पुरेल एवढे साहित्य त्यांनी संबंधित आगग्रस्त कुटुंबाला दिले. पोहचविले.जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने वंदना नखाते,डॉ.स्वाती मोतेवार,डॉ.कविता बोरकर,सौ कल्पना कोथळे, प्रा.सारिका ताजने,हर्षा कहारे,शोभाताई दोडेवार,कृष्णा टेवाणी,करुणा धनेवार,तेजश्री कडू,शोभा दोडेवार या सर्वांची भरभरुन मदत झाली अशी माहिती अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष अलका कोथळे यांनी दिली

Copyright ©