यवतमाळ सामाजिक

केरळच्या तरुणाला महाराजांच्या गड-किल्ल्यांची भुरळ हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास करून १७४ किल्लाला भेट

केरळच्या तरुणाला महाराजांच्या गड-किल्ल्यांची भुरळ हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास करून १७४ किल्लाला भेट

यवतमाळ- १८ एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला प्रेरित होऊन केरळचा तरुण हमरास एम. के. हा त्यांचा ३४२ गडकिल्ले भेटी साठी निघाला आहे. हमरास याने आपली १ मे २०२२ पासून गडकिल्ले सफारीला सुरवात करण्यात आली होती, हजारो किलोमीटर चा प्रवास करून माहूर वरून यवतमाळ शहरात प्रवेश केला होता त्याचा यवतमाळ मधील छत्रपती शिवराय प्रेमींनी जोरदार स्वागत करण्यात आले.

केरळ राज्यातील हमरास कालीकट गावातील, हमरास चे बी.कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून सौदी अरेबिया व दुबई येथे त्याने वाहन चालक म्हणून काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी वाचला सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही गडकिल्ल्यांची माहिती त्यांनी घेतली. हे बघून बहुतांशी गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारल्याचे त्याला कळले आणि शिवाजी महाराजांबद्दल उत्सुकता वाढली शिवाजी महाराजांचा चारणाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी १ मे २०२२ ला त्याने घर सोडले. सतत ११ महीने व काही दिवस सायकल द्वारे केरळ ,कर्नाटक द्वारे महाराष्ट्र असा हजारो किलोमीटर प्रवास करून आज पावतोर १७४ गडकिल्ल्यांना त्याने भेटी दिल्या,

प्रवासादरम्यान त्याला त्याच्यासारखे अनेक प्रवाशी भेटले त्यांनी एकमेकांना मदतीचा हात दिला, हमरास ने आता पर्यंत रायगड, तोरणा, प्रतापगड, लोहगड, विसापूर, सुधागड, मृगगड, हरिहरगड, माहुलीगड इत्यादी शेकडो मुख्य किल्यांसह माहुरगड, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, अलंग-कलंग- मलंगसह १७४ गडकिल्ले सर केले आहेत,

हे सर्व गडकिल्ले बघून झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी यवतमाळ जिल्ह्यात भेट दिली या भेटी दरम्यान यवतमाळ मधील शिवराय प्रेमींनी शिवतीर्थावर हमरासचे थोडीफार मदत करून व स्वागत करून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विनोद दोंदल, संकेत लांबट, स्पनील इंगोले, विकास लसंते, नितीन गिरी, दिलीप राखे, डॉ.महेश मनोहर, डॉ. हर्षल झोपाटे, राकेश लोणकर, व्यंकट कुटावार, वैभव जाधव ढोलपथक सदस्य इत्यादी अनेक शिवराय भक्त उपस्थित होते.

गडकिल्ल्यांना नवसंजीवनीची गरज

काही मोजके गडकिल्ले सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण चरण स्पर्शाने इतिहासाचा वारसा असलेल्या अनेक गड किल्ल्याचे पडझड झाली आहे, ते किल्ले दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली तर अनेक किल्ल्यावर दारूच्या बाटल्या किल्ल्याच्या भिंतीवर कोरलेले नावे इत्यादीमुळे किल्ल्याची दूरव्यवस्था झाल्याचे सांगत किल्ल्याचा सांभाळ करून त्यांना नवजीवन देण्याची गरज असल्याचे सांगितले..

Copyright ©