यवतमाळ सामाजिक

नळाचे बील वाटप करणा-यांच्या मनमानीचा यवतमाळकरांना आर्थिक भुर्दंड

नळाचे बील वाटप करणा-यांच्या मनमानीचा यवतमाळकरांना आर्थिक भुर्दंड

– वाघापूर परिसरात जुलै 2022 पासून नळाचे बील वाटलेच नाही

– ज्या नळ ग्राहकांना बील दिले नाही त्या सर्वांचेच घर दाखविले लॉक

यवतमाळ: येथील वाघापूर, बनकर लेआऊट, एकता नगर परिसरात जीवन प्राधीकरण द्वारे नियुक्त केलेल्या ठेकेदाराने जुलै 2022 पासून मार्च 2023 पर्यंत नळाचे बील वाटलेच नाही. एप्रीलमध्ये अचानक आलेल्या भरमसाठ पानी बील मुळे या परिसरातील नागरीक चक्रावून गेलेत. याबाबत मजिप्रा कार्यालयात विचारणा करण्यास गेलेल्या नागरीकांच्या तक्रारींना येथील अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, नळाचे बील वाटप करणा-या ठेकेदारांवर मजिप्रा अधिकारींचा आणि बीले वाटणा-या मुलांवर ठेकेदाराचा कसलाही वचक नसल्याचे यावरून सिध्द होत आहे. मनात येईल तेव्हा नळ ग्राहकांना बील वाटप करण्याचा प्रकार सध्या यवमाळात सुरू आहे. एकाचवेळी हजारो रूपये आलेले पानी बील कसे भरायचे, बील कमी करण्यासाठी मजिप्रा कार्यालयाच्या चकराच मारायच्या का? असा सवाल नागरीक विचारीत आहेत. ज्या कालावधीत या परिसरातील नळ ग्राहकांना पाणी बील मिळाले नाही त्या सर्वाचेच घर चक्क ‘LOCK’ दाखविण्याचा पराक्रमही मजिप्रा द्वारे करण्यात आला आहे. एवढचे नाही तर काही नळ ग्राहकांना 40 हजार रूपये पर्यंतचे बील मजिप्रा कडून देण्यात आले आहे. याबाबत मजिप्रा अधिकारींना या परिसरातील नागरीकांना जाब विचारला असता ही चुक ठेकेदाराची असल्याचे सांगून त्यांनी जबाबदारीपासून हाथ झटकण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ येथील मजिप्रा ठेकेदार चालवितो का असा सवाल यावेळी नागरीकांना विचारला. एवढेच नाही तर दुरूस्त करून दिलेल्या पाणी बीलमध्ये ही चुका करण्याचे हे मजिप्रा अधिकारी विसरले नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरीकांनी न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Copyright ©