महाराष्ट्र सामाजिक

सेवाग्राम येथे बेलदार व तत्सम जातीचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले संपन्न

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे 

सेवाग्राम येथे बेलदार व तत्सम जातीचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले संपन्न

बेलदार समाजाने केले ठराव पारित समाजाचे प्रश्न सर्व पक्षाच्या जाहीरनाम्यात यावे व राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळावे.

नागपूर – महात्मा गांधींच्या पावनभुमीत सेवाग्राम येथे रविवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पासून बेलदार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.या अधिवेशनात विदर्भ,मराठवाडा,कोकण,पश्चिम महाराष्ट्र,खानदेश व मुंबई भागातून बेलदार समाजातील सक्रिय कार्यकर्ते उपस्थित राहून भविष्यातील बेलदार समाजाच्या विकासात्मक व राजकीय धोरणाची आखणी करण्यात आली.

बेलदार समाजाचा प्राचीन काळापासून गौरवशाली इतिहास असून देशाच्या विकासात मोठा हातभार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प.पू.महात्मा गांधी,महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली.

उदघाटक म्हणून डॉ.मुक्तेकश्वर मुनशेट्टीवार यांनी अधिवेशनाचे रीतसर उदघाटन केले.या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून जानकीराम पांडे उत्तर महाराष्ट्र,भानुदास जाधव मराठवाडा,साहेबराव कुमावत खानदेश,राजूभाऊ सोळंकी कोकण, राजेंद्र बढिये,प्रभाताई चिलके, अण्णाजी गुंडलवार विदर्भ,उपस्थित होते.पहिले सत्र भटके विमुक्त व बेलदार या विषयात मा.दीनानाथ वाघमारे यांनी बेलदार समाजाची परिस्थिती,भटकंती, समाजाच्या लोकांची सध्याची परिस्थिती यावर सखोल विचार मांडले.अधिवेशनाचे दुसरे वक्ते अशोक आकुलवार यांनी समाज हा देणारा झाला पाहिजे, बेलदार समाज सकल समाजाच्या मुख्य लाईन मध्ये दिसणे गरजेचे आहे असे विधान केले तर तिसऱ्या सत्राचे वक्ते प्रसन्नजीत गायकवाड यांनी समाजाची मुलं ही शिक्षण प्रवाहात कसे येतील,प्रवेशासाठी असणारे कायदे,त्यातील अडचणी प्रवेशाला लागणारे कागदपत्रे, नसतानी प्रवेश कसा देता येईल व आर.टी.ई.याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

बिऱ्हाडकार अशोक पवार यांनी बेलदार बोलीभाषा व साहित्य बिऱ्हाड बेलदार दर्शन या विषयावर मार्मिक मांडणी केली.बेलदार समाजाचे सर्वेक्षण कसे करावे यासाठी डॉ. अंकुश पवार यांनी योग्य माहिती दिली.तसेच त्यांनी सर्वेक्षण ॲप सुरु केल्याचे सांगीतले,बेलदार समाज राजकीय स्थितीची माहिती मांडताना डॉ.राजेश तोटावार यांनी समाज एकत्र करून त्याची बांधणी करून आणि आपले आयकॉन सामोर करीत राजकीय फळी तयार करून ग्रामपंचायत पासून तर आमदार, खासदार कसे होता येईल यानुसार बांधणी करून ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.असे मत मांडले

या कार्यक्रमाची प्रस्तावना मुकुंद अडेवार यांनी केली तर संचालन प्रा.रुपेश कुचेवार यांनी केले तर, आभार विजय कोपुलवार यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी,सुधीर ताटेवार,सुनील दुप्पलवार,अनिल जंगीटवार,विनोद आकुलवार,प्रकाश बमनोटे, लक्ष्मीकांत माडेलवार,डॉ राजेश आसमवार,राजुभाऊ गुरडवार, चंद्रशेखर मेंडेवार,खिमेश बढिये , युवराज मोहिते,सुनील कोपुलवार, अनिल चव्हाण,विलास पवार, अप्पासाहेब चव्हाण,प्रा.संजूकुमार जाधव,द्वारका ईमडवार,स्वाती अडेवार,आणि वर्धा,नागपूर,चंद्रपूर, जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व महिला प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली.

Copyright ©