यवतमाळ सामाजिक

वंचित बहुजन आघाडी घाटंजी कडून पंचायत समिती कार्यालय समोर मंगळवार पासून बेमुदत आंदोलन चालु

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार 

वंचित बहुजन आघाडी घाटंजी कडून पंचायत समिती कार्यालय समोर मंगळवार पासून बेमुदत आंदोलन चालु

गेल्या अनेक दिवसापासून घाटंजी पंचायत समितीचा कारभार ढेपाळला असून तालुक्यातील शेतकरी व म.गां.रा.ग्रा.रो.ह. च्या विविध योजने मध्ये काम करणारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ते बेरोजगार झाले आहेत आणि म.गां.रा.ग्रा.रो.ह. च्या विविध योजने प्रत्यक्ष लाभार्थी पंचायत समितीच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून गेले आहे. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता सकारात्मक नसून वंचित घटकाला न्याय देण्याकरिता दुर्लक्ष करीत आहे ,त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पंचायत समितीच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे .

तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी याबाबत माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिनांक १४ सप्टेंबर २०२२ ला निवेदन देऊन सुद्धा पंचायत स्तरावर सुधारणा झालेली नाही.म्हणून दिनांक १८ /०४ /२०२३ मंगळवार रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे .

प्रमुख मागण्या :-

१ ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येत असलेल्या सर्व कामाला तात्काळ मंजुरात देऊन कामे

त्वरित सुरू करा .

२ ) मजुराचे हजेरी पत्रक( मस्टर) काढण्याकरिता तालुकास्तरावर पाच ते सहा डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी.

३ ) मस्टर मागणीवर व मस्टरवर संबंधित ग्रामपंचायत सचिवाच्या सह्या बाबत होत असलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे

लाभार्थी अडचणीत येत आहे, यावर तात्काळ तोडगा काढून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.

४ ) पंचायत च्या कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग व घरकुल विभाग इत्यादी विभागात गेल्या अनेक दिवसांपासून

प्रलंबित असलेल्या फाइली निकालात काढण्यात याव्या .

५ ) म.गां.रा.ग्रा.रो.ह योजनेच्या कामाबाबात गटविकास अधिकाऱ्यांच्या राज्य व्यापी बहिष्कार आंदोलनावर तत्काळ

तोडगा कडून , म.गां.रा.ग्रा.रो.ह ची योजना प्रभावी पनणे राभविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा .

Copyright ©