यवतमाळ सामाजिक

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवा निमित्य विविध कार्यक्रम

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवा निमित्य विविध कार्यक्रम

(भव्य शोभायात्रा,म.बसवेश्वरांचा रथ विशेष आकर्षण असणार)

महात्मा बसवेश्वरांनी

जात, धर्म, वर्ण, लिंग, व्यवसाय,

लहाण मोठा, श्रीमंत-गरीब या

पैकी कोणत्याही बाबीला अनुसरुन

व्यक्तीचे महत्व कमी किंवा अधिक

लेखले नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक

व्यक्ती समान होती. कारण ते

मानवतेला साध्य समजायचे. पण

हा भावसुद्धा तेव्हाच निर्माण होऊ

शकतो जेव्हा आपल्यातली

‘अहम’ किंवा गर्व पणाची वृत्ती

संपुन जाते. याविषयीची त्यांची

ती भूमिका ते ‘मजवीना नाही अन्य

कोणी लहान, शरणांवीना नाही

कोणी महान. ‘अश्या

महामानवाचा जयंती उत्सव

वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान, बसव क्लब,लिंगायत महिला मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजीत

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२३ मोठ्या उत्साहात आयोजीत करण्यात येत आहे,दोन दिवसीय कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे,दि.२२एप्रिलला सकाळी ८ वाजता महात्मा बसवेश्वर चौकातुन भव्य मोटर सायकल रॅली ला सुरवात होऊन शहरातील विविध भागात फिरून महात्मा बसवेश्वर भवन लोहारा येथे समारोप होईल,त्यानंतर सांय ६ वाजता गणपती मंदिर ,वाणीपुरा येथुन महात्मा बसवेश्वरांची भव्य शोभायात्रा निघणार असुन ह्या मध्ये वसुधा प्रतिष्ठान द्वारा महात्मा .बसवेश्वरांचा विद्युत रोशनाई केलेला रथ विशेष आकर्षण राहणार आहे,सोबतच अश्वधारी मुले, भजणी मंडळ, वाद्यवृंद असे आकर्षण राहणार आहे,रात्री विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण आणि महाप्रसाद होणार आहे,तसेच या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवामध्ये खालील प्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

बसवेश्वर जयंतीचे दोन दिवसांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे शुक्रवारदि. २१ एप्रिल२०२३ ला

चित्रकला स्पर्धा

चित्रकला स्पर्धेचा विषय

गट अ:- महात्मा बसवेश्वरांवरिल जिवन कार्य आणि गट ‘अ’ – १५ वर्षाच्या आतील मुले-मुली आणि गट ब:-१६ वर्षावरिल सर्व सहभागी होऊ शकतील.गट ब:-विषय महात्मा बसवेश्वरांचे सामाजीक कार्य

प्रकल्प अधिकारी ह्यांना संपर्क करून आपला नोंदणी क्रमांक घ्यावा

रंग साहित्य प्रत्येकाने सोबत आणावे,

प्रकल्प अधिकारी

,विनोद नारिंगे,भुषण तंबाखे, नागेश कुल्ली,निर्मल ठोंबरे हेआहेत.

वक्तृत्व स्पर्धा सांय ५ वाजता महात्मा बसवेश्वर भवनात आहे वक्तृत्व स्पर्धेचा विषय महात्मा बसवेश्वरांचे सामाजिक कार्य हा असुन ह्या मध्ये गट ‘अ’ – १६ वर्षाखालील मुलं-मुली तसेच गट ‘ब’ विषय : बसवेश्वर स्थापित अनुभवमंटपाचे कार्य आणि श्रमाचे (कायकाचे) महत्व हा आगे,१६ वर्षावरील कोणीही सहभागी होऊ शकतील सहभागी वक्त्यांना भाषणासाठी ५ मिनीटाचा अवधी दिला जाईल. प्रकल्प अधिकारी :

प्रा.डॉ. किशोर मांडगावकर,मंगेश शेटे आपणास हे आहेत.

वेशभुषा स्पर्धा सांय ६ वाजता विषय भारतीय महान स्त्री, पुरुष व्यक्तीरेखा

गट अ,गट ब,प्रकल्प अधिकारी सौ.शिल्पा बेगडे,सौ.रेणुका कुल्ली आहेत

सायंकाळी ७ वाजता संजय माटे प्रस्तुत माझं काय चुकलं? हे महात्मा बसवेश्वरांचे जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग आयोजित केला आहे.

सर्व स्पर्धा दि.२१एप्रिल ला महात्मा बसवेश्वर भवन ,लोहारा येथे आयोजीत केल्या आहे.सर्व स्पर्धांकरीता आकर्षक असे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

तसेच मोटर सायकल रॅली,आणि शोभायात्रे करिता रमेश केळकर, जयंत डोंगरे, महेन्द्रं ठोंबरे,संजय तोडकरी,सारंग गाढवे,अजय खारपाटे,राजु कुऱ्हेकर , चिरायु हातगांवकर,बाळासाहेब दिवे,

सुरेश शेटे,अशोक तेले,गजानन हातगांवकर , निलेश शेटे,राजु कुऱ्हेकार, विनोद देशमुख हे परिश्रम घेत आहेत लिंगायत समाजातील बुरड,गवळी समाज बंधू-भगिनींनी या दोन दिवसीय महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवात सहर्ष सक्रीय सहभागी होऊन कार्यक्रमास शोभा आणावी ही विनंती वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर ह्यांनी केले आहे.

Copyright ©