यवतमाळ सामाजिक

संपादक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.अंकुश वाकडे

संपादक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.अंकुश वाकडे

ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दैनिक पब्लिक पोस्टचे मुख्य संपादक प्रा. अंकुश वाकडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रातील नामांकित वर्तमानपत्रांमध्ये प्रा. अंकुश वाकडे यांनी संपादक तथा जिल्हा प्रतिनिधी पद उपभोगले आहे. विविध विषयांवर त्यांनी परखडपणे लिखाण केले असून त्यांची सदरे सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलीच गाजली. ऑल इंडिया संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष करण मिलिंद यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी त्यांची निवड केली. यावेळी उत्तरप्रदेश धर्मेंद्र कुमार राणा, उत्तराखंड डॉ. प्रमोद कुमार, मध्यप्रदेश विवेक डेहरिया, राजस्थान एडवोकेट अर्जुनलाल बैरवा, कमिटीचे सदस्य जितेंद्र चौधरी, सतीश आर्याजी, आशिष गौतम तसेच महाराष्ट्रातील मनोहर बारसे, पवन गायकवाड, इत्यादींची उपस्थिती होती. सोबतच महाराष्ट्रातील खालील जिल्हाध्यक्षांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली. पुणे स्वप्नील कांबळे, अमरावती सचिन पाटील, वाशिम प्रकाश खंडारे, परभणी धम्मपाल हनवते, सोलापूर महेश गायकवाड, जालना संतोष जाधव,अकोला महिंद्र डोंगरे, संभाजीनगर प्रमोद प्रधान, बीड बाळासाहेब साबळे, इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या संपादकीय व्यक्तींचं हे देशातील सर्वात मोठे संघटन असून विविध प्रकारच्या समस्या शासनाच्या दरबारी मांडून त्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेषतः संपादकांना सन्मानाची वागणूक समाजात व प्रशासनात मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने आता संपादकांसाठी विशेष कायद्यानुसार तरतूद करायला हवी!

प्रा. अंकुश वाकडे

अध्यक्ष ऑल इंडिया संपादक संघ

देशामध्ये सर्वात जास्त संपादकांच्या समस्या सुद्धा महत्त्वाचे आहेत. सर्वसामान्यांच्या समस्यांवरती परखडपणे शासन दरबारी मांडण्याचे धाडस संपादक करत असताना त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये शासनाच्या सोयी आणि सवलती दिल्या जात नाही. त्या तातडीने देण्यात याव्यात याकरिता पाठपुरावा केला जाईल. सदर संघटन हे देशातील मजबूत संघटन असून भारतामधील सर्व राज्यांमध्ये ऑल इंडिया संपादक संघ सक्रिय आहे.

संस्थापक अध्यक्ष

करण मिलिंद, लखनऊ

Copyright ©