Breaking News यवतमाळ सामाजिक

यवतमाळात ओबीसी चां जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

प्रतिनिधी प्रविण बोरकर
17 एप्रिल 2023 ला राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा च्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा च्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतात 567 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. हा आंदोलनाचा तिसरा टप्पा होता.

ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे!!

ईव्हीएम मशीन वरील निवडणुका बंद झाल्या पाहिजे !

शेतमालाला योग्य भाव दर देण्यासाठी शेतमालाची हमी देणारा कायदाmsp) सरकारने बनवला पाहिजे!

लॉकडाऊन च्या काळामध्ये कामगाराच्या हिताचे जुने कामगार कायदे केंद्र सरकारने निरस्त केले. ते पुन्हा नव्याने जसेच्या तसे लागू केले पाहिजे!

खाजगीकरणाचे धोरण तात्काळ रद्द केले पाहिजे!

वरील मुद्द्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा !नही चलेगा!!

ओबीसीची जातवार जनगणना झालीच पाहिजे झालीच पाहिजे!!

खाजगीकरणाचे धोरण रद्द झालेच पाहिजे!

ईव्हीएम मशीन ने क्या किया देश का सत्यानाश किया!!

अशा घोषणा देत आझाद मैदान वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व गजानन उल्ले यांनी केले , BIN राज्याध्यक्ष सुषमा राजदीप ,BMP च्या महासचिवसारिका भगतमॅडम,विलास भोयर, गजानन ऊले (राज्य उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा), मा राजेंद्र राजदीप, इंजिनियर प्रशांत मुनेश्वर, इंजी. प्रशांत ठमके,विनोद राठोड, बळीराम दिवटे ,गजानन मडावी,विनोद मुदाने ,सुरेंद्र परडके, हरीश राऊत अरुण शेंद्रे सत्यशील देवतळे, अंकुश डडमल, राजीव फुल्लके, विनय फुल्लके ,अमोल गायकवाड, विनोद राठोड, संदीप मून आशा चंदनखेडे दत्ता मेकवाड ,विपुल चव्हाण ,मायाताई शेंद्रे ,सुनील गवई ,सुनीता पोपटकर, यशोदा मानकर, नंदा वाकोडे, दारासिंग तगरे, कदम सर ,आशिष काळे, देवराव साठे ,प्रवीण रंगारी, नामदेव ढोकणे ,सुनील मोहरले ,सुरेश बेले, सुनील बेले सुरेश राठोड ,गजानन गोडवे ,नीरज कचवे ,भीमराव भगत इत्यादी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.

Copyright ©