यवतमाळ सामाजिक

विभागीय कार्यालया समोर लीपिकाचे धरणे

विभागीय कार्यालया समोर लीपिकाचे धरणे

विभागीय कार्यालया समोर लीपिकाचे धरणे

यवतमाळ आज दिनांक 17 एप्रिल ला यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकाच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

संदीप बाबाराव पवार ( लिपिक स्थापत्य शाखा) त्यावर गेल्या अनेक दिवसापासून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत दमदाटी करून टॉर्चर केल्या जात आहे. अत्याचार होत आहे .त्यांना मूळ आस्थापनेच्या कामाव्यतिरिक्त इतरत्र कुठेही काम देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत त्यांना जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

त्याविरुद्ध त्यांनी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेकडे लेखी अर्ज देऊन स्वतःची व्यथा कळवली होती.

या कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज जिल्हाभरातील अनेक कार्यकर्ते एसटी महामंडळाच्या विभागीय ऑफिस समोर एकवटले .एमएसआरटीसी च्या विभागीय प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली., आंदोलनाचा परिणाम म्हणून आज विभागीय नियंत्रक यांनी तात्काळ त्यांना मूल आस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी आदेशित केले. आणि वाहतूक अधिकारी इंगळे यांच्या चौकशीचे आदेश दिले.

हे आंदोलन गजानन उले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्याध्यक्ष राजेंद्र राजदीप सर उपस्थित होते.BMP च्या महासचिव सारिका भगत, .BIN च्या राज्याध्यक्ष सुषमा राजदीप, प्रोटान चे जिल्हाध्यक्ष किशोर राठोड,महिला मूलनिवासी संघाच्या पदाधिकारी सुनीता पोपटकर, नंदा वाकोडे ,आशा चंदनखेडे, मायाताई शेंद्रे ,यशोदा मानकर, विनोद थूल,समाधान साबळे ,दारासिंग तगरे ,सुनील मोहरले, प्रशांत मुनेश्वर ,गजानन मडावी , सुनील बेले ,नीरज कचवे ,अंकुश डडमल, विनोद राठोड ,धम्मानंद तागडे, मंगेश लोणकर नितेश नगराळे,विनोद मुधाणे महेंद्र मेश्राम , बागेश्वर सर, कदम सर इत्यादी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©