Breaking News यवतमाळ

गुरुदेव नगरमधील नाला ठरतोय नागरिकांसाठी डोखेदुखी

उपसंपादक सदानंद जाधव

गुरुदेव नगरमधील नाला ठरतोय नागरिकांसाठी डोखेदुखी

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या नाल्या चे काम अत्यंत संथगतीने व ठरल्या प्रमाणे होत नसल्याने 

रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

शहरातील प्रतिष्ठित व अति शांत मानल्या जाणाऱ्या गुरूदेव नगरातील नागरिकांनी तहसिल कार्यालया लगत असलेल्या नाल्याचा अनेक वर्ष त्रास भोगून नुकतेच काही वर्षा पूर्वीच त्या त्रासातून गुरूदेव नगर वाशीयांना मुक्ती मिळते न मिळतेच की पुन्हा ऐका नाल्या मुळे गुरूदेव नगरातील नागरिक त्रस झाले आहेत. जुन्या नाल्या पेक्षा ही जास्त रुंदी व खोली असलेला हा तुंबून भरलेला नाला ऐका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या घरासमोर आहे हे विशेष. या चुकीच्या नाल्याला योग्य वळण देण्यासाठी याच नगरात पुन्हा एका नवीन नाल्याचे काम चालु झाल्यापासुन गुरुदेव नगर वाशीयांना त्रासा सह संकटाना सामोरे जाव लागत आहे. या नाल्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने येथून ये-जा करणाऱ्या व स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारण, नुकत्याच अवकाळी झालेल्या पावसामुळे येथे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते, त्यामुळे घाण पाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत होता. याशिवाय परिसरातील अनेक लहान नाल्यांना या मोठ्या नाल्याशी जोडणी न केल्याने अनेक घरांसमोरील नाल्यांमधील घाण पाण्याचा प्रवाह थांबला आहे.जे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे. विशेष म्हणजे या नाल्याला एक नाला जोडलेला आहे, ज्याची खोली आणि रुंदी मर्यादेपेक्षा जास्त आहे. उर्वरित नाल्यांच्या तुलनेत या नाल्याची रुंदी आणि खोली वाढवणे संबंधित कंत्राटदारांच्या बिलात जबरदस्तीने वाढ करणे हेही आर्थिक गणित कारण असू शकते. यामागचा तर्कही स्थानिक नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, गेल्या वर्षी सुरू झालेल्या नाल्याच्या कामाला जुना नाला उभारून सुरुवात करण्यात आली आहे. जमिनीचा सपाटीकरण न करता कोणताही पाया तयार न करता व बेड न टाकता नाला सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या नाल्यातून वाहणाऱ्या घाण पाण्याचा प्रवाह तर मंदावला आहेच, शिवाय कचरा आणि पाणी साचल्याने नाल्याची सोय होण्याऐवजी समस्याच अधिक बनली आहे

Copyright ©