महाराष्ट्र सामाजिक

देवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

देवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रोषणाई करण्यात आली होती तसेच शुक्रवारी सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ त्यांच्या अनुयायांनी तसेच गावातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार माला अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर तिथे लंगर चे आयोजन करण्यात आले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील जुने बस स्टॅन्ड परिसराला संविधान चौक असे नाव देण्यात आले त्यानंतर संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे समायोजन रात्री ठीक १० वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले या मिरुवणुकीच्या सफलतात डॉ. बाबासाहेब उत्सव समिती तसेच माझी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, समाजसेवक दादाराव मुन,संदीप पाटील,दिनेश भगत,अवधूत बेंदले,प्रमोद कांबळे,धनराज घुबडे,डॉ.प्रमोद कांबळे,सोपानरावं लोखंडे,प्रशांत चहारे,अशोक मुनेश्वर,गौतम गजरे,गौतम भगत, प्रीतम डंबारे,आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Copyright ©