महाराष्ट्र सामाजिक

सिंदखेड आदिवासी सेवा सोसायटी चेअरमनपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार तर व्हाईसचेअरमनपदी माणिकराव पाटील

प्रतिनिधी सुरेखा तळणकर

सिंदखेड आदिवासी सेवा सोसायटी चेअरमनपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार तर व्हाईसचेअरमनपदी माणिकराव पाटील

(माहूर ) माहूर तालुक्यातील आदिवासी सेवा सहकारी संस्था मर्यादित सिंदखेड या सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक 2023-2028 या कालावधी करिता चेअरमनपदी

प्रा . पुरुषोत्तम मुरारी येरडलावार तर व्हाईस चेअरमनपदी माणिकराव गणपतराव कदम पाटील यांची बिनविरोध निवड झाली .

 

दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस. एम .बामणे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचा विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदासाठी इतर कोणाचेही नावे आलेल्या नसल्याने प्रा . पुरुषोतम येरडलावार व माणिकराव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री बामणे यांनी जाहीर केले .संस्थेचे सचिव अतुल राठोड यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले .

संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते ज्योतिबादादा खराटे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा .सभापती दत्तराव मोहिते यांनी विशेष पुढाकार घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

आदिवासी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत दुंड्रा , सिंदखेड, सावरखेड, बामनगुडा , खेडी,बामनगुडा तांडा , रामपूर , भामपुर ,धानोरा , शि . धानोरा ,वायफनी , सेलू आदी 17 गावांचा समावेश असलेल्या आदिवासी सेवा सहकारी सोसायटी सिंदखेडचे नवनियुक्त संचालक श्री शेकन्ना

गुंडावार ,अशोक जोशी, छगनलाल देठे, तुकाराम कोवे , शेषराव पवार, श्रीमती आश्विनी आशीर्वाद कदम ,सौ प्रतिभा येरडलावार ,रामकृष्ण तोडसाम , विजय मंगाम, चुडीराम तोडसाम , विलास पेंदोर या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाचे याप्रसंगी सत्कार करण्यात आला .

सर्व नवनियुक्त पदाधिकारी व संचालक यांचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील ,आमदार भीमराव केराम , मा . आमदार प्रदिपजी नाईक ,भाजपा नेते डॉ . अशोक पाटील सूर्यवंशी , उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते ज्योतिबादादा खराटे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव , भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्या संध्याताई प्रफुल्ल राठोड , धरमसिंग राठोड , राष्ट्रवादीचे युवानेते कपिल नाईक ,प्रा . राजेंद्र केशवे ,मा. सभापती संजय राठोड , मा . सभापती दत्तराव मोहिते ,योगी श्याम भारती महाराज , भाजपाचे संतोष चनमनवार , विस्तारक प्रविण सिरमनवार , ॲड. रमन जायभाये , समन्वय समिती अध्यक्ष विनोद राठोड ,भाजपाचे अच्युत जोशी , श्रीकांत घोडेकर , मा. उपसरपंच नारायण रेकूलवार , संदिप सिद्देवार ,कैलास पेंदोर आदिंनी नवनियुक्त संचालकांना प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या .

Copyright ©