यवतमाळ सामाजिक

जेतवन मध्ये महामानवास अभिवादन

जेतवन मध्ये महामानवास अभिवादन

आधुनिक भारताचे निर्माते घटनाकार डाँ बाबासाहेब आंबेडकर याची 132वी जयंती जेतवन पर्यटन स्थळ हिवारी ता जी यवतमाळ येथें मोठया उत्सवाने साजरी करण्यात आली. सकाळी महामानव बाबासाहेब याच्या पुतळ्याला हार अर्पण करून जेतवन चे संस्थापक रमेश बनसोड व अध्यक्ष अनिल बनसोड यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी जेतवनच्या वतीने रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अनेक युवकाने तसेच महिलांनी रक्त दान करून महामानवास अभिवादन केले. या वेळी जेतवन पर्यटन स्थळाच्या नवीन इमारती मध्ये डाँ बाबासाहेब आंबेडकर मुक्त वाचनालय व अभ्यासिका चे उदघाट्न रमेश बनसोड व मान्यवराचे हस्ते करण्यात आले, सदर अभ्यासिकेत शंभर विद्यार्थी बसून अभ्यास करतील अशी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे, वाचनाची मुलांना सवय लागावी तसेच युवकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी होऊन समाज सेवा करावी डाँ बाबासाहेब यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बँक कडून कर्ज घेऊन पुस्तकासाठी राजगृह उभे केले. जगात डाँ बाबासाहेब यांच्या सारखे पुस्तक प्रेमी महामानव सापडणे कठीण आहे. बाबासाहेब अभ्यास एवढे करत होते की त्यांना जेवणाचे भान पण राहत नसे असे अनेक उदाहरण देऊन रमेश बनसोड यांनी आपले विचार वेक्त केले, या वेळी स्वाती सरकडे (घेवंधे )यांना हिंदी विषयात पी एच डी मिळाल्या बद्दल जेतवन च्या वतीने रमेश बनसोड व मंगला बनसोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रस्थाविक गौतम बनसोड यांनी केले या कार्यक्रमासाठी पंडित वाघ, यश बनसोड, किशोर खिरडकर ,संजय हुलगुंडे, देवा घोडे, स्वाती बनसोड. जोती हुलगुंडे. मनोरमा पढगन इत्यादीने परिसरम घेतले या कार्यक्रमासाठी परिसरातील शेकडो उपासक हजर होते, या ठिकाणी भविकासाठी अन्नदान करण्यात आले.

Copyright ©