यवतमाळ सामाजिक

मैत्री मंडळ यवतमाळ द्वारा शगुण के पल पुस्तकाचे प्रकाशन

मैत्री मंडळ यवतमाळ द्वारा शगुण के पल पुस्तकाचे प्रकाशन

यवतमाळ : मागील १० वर्षांपासून सकल जैन समाजामध्ये अग्रेसर मैत्री मंडळ यवतमाळने संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. पुष्पा प्रकाश चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यक्रम जसे विवाह संस्कार, धार्मिक कार्यक्रम, तपस्या अनुमोदना, साधुसंतांच्या आहार विहार, भोजनव्‍यवस्था आदीमध्ये सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. भगवान महावीर जयंतीच्या शुभदिनी राजस्थानी समाजात लग्नप्रसंगी लागणाऱ्या मांगलीक कार्यक्रमाप्रसंगी महिला संगीत अाणि गितांचे आगळेवेगळे महत्त्व आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालू असून ही मांगलिक गिते पुढील पीढी पर्यंत प्रेषीत करण्याच्या उद्देशाने मैत्री मंडळ यवतमाळद्वारे शगुण के पल या पुस्तीकेचे विमोचन महाविर जयंतीच्या शुभदिनी पोलिस अधीक्षक पवनजी बन्सोड यांच्या शुभहस्ते नागपूर येथील उद्योजक सुभाषजी कोटेचा, जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेशजी खिवसरा, अरुण भाईजी खारा, सुभाषजी जैन, ॲड. प्रकाशजी चोपडा, दिनेशजी बोरा, अशोक श्रीश्रीमाल, संदीप तातेड, उमेश बैद, मैत्री मंडळाच्या संस्थापिका सौ. पुष्पा चोपडा, संस्थेच्या अध्यक्षा सीमा तातेड, शगुण के पल पुस्तकाच्या संपादीका वर्षा तातेड आणि मैत्री मंडळाचे सर्व सदस्य गण याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शगुण के पल या पुस्तीकेचे विमोचन झाल्यानंतर सकल जैन बांधवांसह राजस्थानी समाजामध्ये या शगुण के पल पुस्तकाची मागणी वाढत असून स्वागत होत आहे.

Copyright ©