यवतमाळ सामाजिक

“डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धांत आणि समाज हीच ध्येयपूर्ती ठेवून आयुष्यात कुठलीही तडजोड केली नाही.”- डॉ अनंतकुमार सूर्यकार 

“डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धांत आणि समाज हीच ध्येयपूर्ती ठेवून आयुष्यात कुठलीही तडजोड केली नाही.”- डॉ अनंतकुमार सूर्यकार 

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ, ता. जि. यवतमाळ व समस्त ग्रामवासियांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अतिशय हर्षोल्लासात साजरी करण्यात आली.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व मालार्पण प्रस्तुत प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केले. तदनंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्रिकालात सत्य आहे. हजारो वर्षे प्राण्यांपेक्षाही जीवन जगणाऱ्या मानवी समुदायाला असली माणूस रूपात आणण्याचं क्रांतिकारी कार्य फक्त आणि फक्त बाबासाहेबांनीचं केलं. बाबासाहेबांच्या पूर्वी अनेक समाज सुधारकांनी ही समाजव्यवस्था बदलविण्याचे आटोकाट प्रयत्न केले नाही असे नाही परंतु व्यवस्थेने सर्वांनाच काळाच्या आत गडप केले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात कोणत्याच बाबतीत तडजोड केली नाही. समाजोद्धारक ज्या बाबी आहेत तिथेच तडजोड ,अन्यत्र नाही. पद , प्रतिष्ठा यापेक्षा माझा समाज प्रगत व्हावा हीच धारणा निर्वाणापर्यंत ठेवली. सिद्धांत आणि समाज हेच बाबासाहेबांच्या परिपूर्तीचे ध्येय होते. असे प्रो. डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगोचित वक्तव्य केले.

विठ्ठल कोडापे, डॉ अनंतकुमार सूर्यकार,ताराचंद चव्हाण,संजय कांबळे, सुनील गिरपुंजे, अरूण सोनटक्के, ज्ञानेश्वर कोडापे, महादेव तुमडाम, गणेश सोनोने, शंकर पोहोरकर, दत्ता इंगळे , नारायण सूर्यकार , रामेश्वर गावंडे, पंडित काळे, गणेश जोगे, वसंत वनवे, गोपाल उईके, दीपक हारे, मारोती पवूळ, बहिणाबाई कोडापे, सुशिला गोते,मंदा काळे, राधा मोडले, बेबी ढोके, नंदा सोनटक्के, सुमित्रा मोडले,प्रिया ढोके,अक्षरा मोडले, स्वराली काळे,राणी मोडले,आरूषी मोडले, अजय सूर्यवंशी, पृथ्वी सूर्यवंशी,साहील खेरे, देवा पोहोरकर, रूद्रा खेरे, नैतिक सहारे, अथर्व भागडे, सोहम पवार, अद्विक जाचक, ओम गावंडे, ओम जयस्वाल, मयूर ढोके या सर्वांच्या सहकार्यातून व गावकऱ्यांच्या उपस्थितीमुळे जयंती उत्सव उत्साहात पार पडला. शेवटी संजय कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Copyright ©