Breaking News यवतमाळ सामाजिक

अश्लील गाण्यावर बंदी घालावी,पूजा मिश्रा यांची मागणी

 

अल्ताप तळवी उर्फ अल्ताप शेख (एम. सी. स्टॅन) यांच्यावर कडक कारवाई करावी ः पुजा अमित मिश्रा यांचे ठाणेदारांना निवेदन

यवतमाळ ः समाजामध्ये द्वेष भावना भडकविणारे व सामाजिक स्वास्थ बिघडविणारे तसेच नविन पिढ्याला बिघडविण्यास प्रवृत्त करणारे गायन करणारे अल्ताप तळवी उर्फ अल्ताप शेख (एम. सी. स्टॅन) रा. मुंबई महाराष्ट्र यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पुजा अमित मिश्रा यांनी शनिवार दि. १५ अवधुतवाडी ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पुजा अमित मिश्रा यांना दोन मुले आहेत, आज दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी पुजा अमित मिश्रा मुलांना ऑनलाईन मोबाईल द्वारे शिकवित असतांना युट्युबवर एक लिंक आली त्याला माझे लहान मुलांनी उघउले असता त्यावर एम.सी. स्टॅनचे गाणे सुरु झाले. ते लहान मुले एैकत होते. त्याबद्दल विचारणा केली असता मला कळले कि ते स्पॉटीफाय वरुन ऐकत आहे व ते गाणे मी परत ऐकल्यानंतर गाण्याचे बोल ऐकुन मला जबरदस्त धक्का बसला. सदर प्रकारचे गाणे हे सामाजिक हिताच्या विरोधात असून समाजाचे स्वस्थ बिघडविणारे तसेच लहान मुलांना वाईट प्रवृत्तीकडे नेणारे असून ते नैतिकतेला तसेच सामाजिक बांधिकीला व भारतीय संस्कृतीला छेद देणारे, चार चौघामध्ये खाली मान घालायला लावणारे असल्याचे माझे लक्षात आले. त्यामूळे मी माझे मुलाला तु असे गाणे का ऐकतो व तुला या गाण्याची माहिती कशी मिळाली असे विचारले असता त्याने मला सांगितले की एम सी स्टॅन हा फार मोठा रॅपर गायक असून बिग बॉस १६ चा विजेता आहे. आणि मीच नाहीतर माझे शाळेतील माझे सगळे मित्र याचेच गाणे ऐकतात. म्हणून मला सदरच्या गायकाची माहिती मिळाली. ते ऐकून मी थोडा वेळ स्तब्द झालो आणि आपल्या समाजात हे काय सुरु आहे असा मला प्रश्न पडला. तो गायक याव्दारे भारतीय संस्कृतीचा नाश करीत आहे. सदरची बाब ही देशाच्या युवापिढीसाठी तसेच देशातील इतर नागरीकांसाठी घातक आहे. त्यावर वेळेवर बंधन आणणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी आपणास या लेखी तक्रारीव्दारे तकार करीत आहे की सदरहू व्यक्तीने त्याने केलेल्या कृत्यासाठी व करत असलेल्या कृत्यासाठी व पुढे भविष्यात करण्यात येणा-या अशा प्रकारच्या कृत्यासाठी त्याचेवर बंधन आणणे व कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्याद्वारे गायीलेले अश्लील प्रकारचे सर्व गाण्यावर बंदी घालण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सौ. पुजा अमित मिश्रा यांनी निवेदनातून केली आहे.
या तक्रारीच्या प्रती पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ, पोलीस कमिश्नर अमरावती, गृहमंत्री कार्यालय महाराष्ट्र, केंद्रीय गृहमंत्री कार्यालय दिल्ली, सामाजिक व सांस्कृतिक संवर्धन कार्यालय महाराष्ट्र, प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली यांना पाठविले आहे.

Copyright ©