देवळी प्रतिनिधी:सागर झोरे
वायगाव येथून ३ किमी असलेल्या भिवापूर शेत शिवारात शेतकऱ्याने गहू काढून गव्हाचे कुटार शेतात ठेवले होते त्या कुटाराला अचानक शुक्रवारी रात्री १०.३०च्या दरम्यान आग लागल्याने कुटार जळून खाक झाले तसेच सोबत ठेवलेले मोठे जडाऊ लाकूड ही जळून खाक झाले त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
भिवापूर येथील शेतकरी बंडू गणपतराव भोयर वय ५५ वर्ष यांच्या शेतात गुरेढोरांना टाकण्यासाठी गव्हाच्या मळणीतून काढण्यात आलेला कुटार साचून ठेवलेला होता त्याकुटाराने तो शेतकरी वर्षभर आपल्या गुराढोरांना खाण्यासाठी वर्षभर उपयोगात आणत असे परंतु अचानक या कुटाराला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले तसेच गुराढोरांना वर्षभरासाठी टाकण्यात येणारा चारा जळून खाक झाल्याने शेतकऱ्यासमोर आपले गुरे ढोरे जगविण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसानाकडे लक्ष देऊन त्याची मदत करावी असे आवाहन शेतकरी बंडू भोयर यांनी केले आहे.
Add Comment