विदर्भ सामाजिक

*दारू घेवून जाणाऱ्या दूचाकीचा अपघात दोन गंभीर*

 

खुलेआम दारू तस्करी होत असतांना देवळी पोलीस चिर निंद्रेत

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

राष्ट्रीय महामार्गावर हुसनापूर टोल नाक्याजवळ दूचाकी ने दारूची वाहतूक करणाऱ्यांनी दारूच्या धूंद नषेत एका चारचाकी वाहनाला पाठीमागून धडक देवून दूचाकी सह कोसळले व त्यात ते जबर जखमी झाले अपघात घटनास्थळी दारू्च्या बाटल्यांचा सडा दिसून येत होता
यावेळी अपघात होताच टोल कार्यरत कर्मचारी सचिन वानखेडे,कूणाल वटाणे यांनी जखमींना तातडीने एन,आर,एच रूग्णवाहीकेत टाकून भिडी येथे रवाना केले तसेच दुचाकी नंबर एम,एच,४०एम१६८५ अपघात दूचाकी स्वार जखमी मंगेश मसराम,वय ३७ वर्ष,सूनिल नान्हे वय ४५वर्ष राहनार वाबगाव असे असून. देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम दारू तस्करी होत असताना ठाणेदार तिरुपती राणे हे आपल्या प्रमोशन च्या नांदी असून यांनी दारू तस्करांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे,अशी चर्चा देवळी तालुक्यात सुरु आहे.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

Copyright ©