यवतमाळ राजकीय

यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी संदीप हांडे यांनी तीन एकर शेतात केली सफरचंदाची यशस्वी लागवड ; मंत्री संजय राठोड यांनी केली पाहणी

यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी संदीप हांडे यांनी तीन एकर शेतात केली सफरचंदाची यशस्वी लागवड ; मंत्री संजय राठोड यांनी केली पाहणी

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी संदीप हांडेचे केले कौतुक

शेतकरी संदीप हांडेच्या प्रयोगशील शेतीतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळेल दिशा – मंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.१५ एप्रिल :- यवतमाळ जिल्ह्यातील वाढोना बाजार ता. राळेगाव येथील प्रयोगशील शेतकरी संदीप निळकंठराव हांडे या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात यशस्वीरित्या सफरचंदाची लागवड केली आहे. आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी या प्रयोगशील शेतकऱ्याची भेट घेऊन पाहणी करत शेतकरी संदीप हांडे यांचे या यशस्वी प्रयोगाबद्दल विशेष कौतुक केले. तसेच हा प्रयोग महाराष्ट्रातील शेतक-यांना दिशा देणारा ठरेल असे प्रतिपादन केले.

यवतमाळ जिल्ह्यातील वाढोना बाजार ता. राळेगाव येथील प्रयोगशील शेतकरी संदीप निळकंठराव हांडे या शेतकऱ्याची राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज सदिच्छा भेट घेतली. या शेतकऱ्यानं चक्क आपल्या तीन एकर शेतात सफरचंदाची यशस्वी लागवड केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अतिउष्ण असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात हा प्रयोग या प्रयोगशील शेतकऱ्याने यशस्वी केला. हा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे. या सफरचंदाच्या शेतीची त्यांनी पाहणी करत संदीप सारख्या प्रयोगशिल शेतकऱ्याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शेतकरी संदीपने सुमारे तीन एकर शेतात लागवड केलेल्या या सफरचंदाच्या झाडांचे वय दोन वर्ष इतके असून या झाडांना फळधारणा देखील जोरात झाली आहे. संदीपने केलेला हा प्रयोग महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना दिशा देणारा ठरेल असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी असे नवनवीन प्रयोगास प्राधान्य देऊन शेती करावी असे आवाहन करत संदीप हांडे यांच्या यशस्वी प्रयोगाबद्दल त्याचे विशेष कौतुक केले.

Copyright ©