यवतमाळ सामाजिक

अप्सरा टॉकीज चौकातील मटक्याला पाठबळ कुणाचे 

यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे

अप्सरा टॉकीज चौकातील मटक्याला पाठबळ कुणाचे 

यवतमाळ:- येथील मध्य वस्तीत खुले आम मटका सुरू असतानाही पोलीस कारवाई का नाही? असा सवाल सर्वसामान्य जनते कडून करण्यात येत आहे,

हे आल्या दिवसांत प्रत्येक अवैध्य धंद्या बाबत प्रसिद्ध झालेले असून मटका या अवैध्य धंध्याचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते,असे असतानाही पोलिसांना या मागील मोठी आवक असल्याचे बोलल्या जात आहे. यवतमाळ मधील मटक्याच्या अड्डया पैकी एक अप्सरा टॉकीज चौकातील मटका जोरा शोरात सुरु असून या मटक्याच्या धंदा करणार मालकाला मोठे पाठबळ असल्याने खुले आम् मटका जुगार खेळणे सुरू आहे या अड्याला मोठे पाठबळअसल्याचे चर्चिल्या जातआहे. अप्सरा चौक हा पोलीस अधीक्षक,व पोलीस निरीक्षक या तीनही पोलीस अधिकार्यांच्या अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही इकडे कुणी ढुंकूनही का? पहात नाही ! हे एक कोडच म्हणाव लागेल, येथील चौकामध्ये ज्या ठिकाणी मटका चालते त्या ठिकाणी मंदिर सुध्दा आहे त्या मुळे येथील नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांनी अनेक वेळा विनंती केली मात्र कुणीही दखल घेत नसल्याने आले या भोगाशी व्हावे या सादर अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. तक्रार करा कि निवेदन द्या मात्र मटका राजरोस पणे सुरु राहते या वरून यवतमाळ शहर हे अवैद्य व्यावसायाचे केंद्र असल्याने रक्षकच भक्षक असेल तर कोण काय करणार,प्रत्येक क्राईम खुले आम् होत असल्याचा पुरावा आहे.या मुळे सर्व सामान्य जनतेला भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे,शांत प्रिय शहराला अशांतीचे ग्रहण लागल्याने यात सामान्य जनता भरडली जात आहे. या कडे

जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे,याची दखल घेऊन कारवाई करेल का ?असा सवाल सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©