यवतमाळ सामाजिक

लो. बा. अणे महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

लो. बा. अणे महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे, दिनांक 14 एप्रिल रोजी विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. दुर्गेश कुंटे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून डॉ. सतपाल सोवळे हे लाभले होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. सतपाल सोवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले तथा त्यांनी केलेल्या अफाट कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंटे सर यांनी “महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्राध्यापकांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे !”असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगीत अभ्यास मंडळावर नव्याने नियुक्त झालेल्या प्रा. डॉ. चंद्रशेखर कुडमेथे यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्वाला नागले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मोनाली सलामे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा. डॉ. सरिता देशमुख, श्री. नितीन वालदे, श्री वैभव चौधरी, कु. प्रीती तिवाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©