यवतमाळ सामाजिक

बोथगव्हान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

प्रतिनिधी : प्रवीण बोरकर 

बोथगव्हान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

यवतमाळ जवळच असलेल्या असलेल्या ग्रामपंचायत बोथगव्हाण येथे संविधान निर्माते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वि जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात मान्यवर पोलीस पाटील. भूपेश बोरकर पोलीस कॉन्स्टेबल तांबखे सरपंच. सतीश नगदीवे. उपसरपंच मनोज मोरे. सदस्य दिलीप महापुरे.सभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सूरज खोब्रागडे तसेच येथील ग्रामस्थ व अनेक मान्यवर या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर प्रज्ञा महिला मंडळ यांनी दीप प्रज्वलणं करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत झेंडा वंदन करून व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली.त्यावेळी ठीक ठिकाणी मसाले भात व निंबू सरबत चे आयोजन करण्यात आले. बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला या वेळी आकाश पाटील अरविंद बोरकर प्रशांत मेश्राम यांनी परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनि सर्व समाजासाठी गुलामगिरी तुन मुक्त करण्यासाठी कशा प्रकारे कार्य केले या बाबत मार्गदर्शन करण्यात आले

या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©