यवतमाळ सामाजिक

लाडखेड मराठी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी     

लाडखेड प्रतिनिधि अन्सार खान 

लाडखेड मराठी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी     

१४ एप्रिल.2023 आधुनिक भारताचे निर्माते भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती कार्यक्रम जि.प.प्रा.म.केंद्रिय शाळा लाडखेड येथे घेण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी लाडखेड केंद्राचे केंद्रप्रमुख मारोतराव पडाळ होते.तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विठ्ठलराव थेटे ,शाळेतील जेष्ठ शिक्षिका सिंधुताई दुधे,प्रणिता मोरे होत्या. सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर वर्ग १ ते ४ वर्गातील विद्यार्थाची भाषणे झाली.त्यानंतर मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. वर्ग १ली मधील वैष्णवी नरेंद्र कसंबे हिने उत्कृष्ट भाषण दिल्यामुळे केंद्रप्रमुख मारोतराव पडाळ सर यांनी तिला बक्षीस दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल जगाने घेतली असून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगितले.सुत्रसंचलन अनुराधा कराळे यांनी केले तर आभार घनश्याम बावणे सर यांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षक किशोर उईके,शिल्पा काळे, सुनिता नासरे, प्राजक्ता दुधे व विद्यार्थी उपस्थित होते.

Copyright ©