यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

माहूरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटात साजरी होणार

श्रीक्षेत्र माहूर  सुरेखा तळनकर   

माहूरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटात साजरी होणार.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व माता रमाई महिला मंडळ यांचे वतीने वॉर्ड क्र.17 मध्ये चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची 2327 वी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी केली जाणार आहे.

दि.14 एप्रिल रोजी स.10 वा. नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजरोहन होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी आ. प्रदीप नाईक हे भूषविणार आहेत, तर माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव,मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे, माजी जि. प. सदस्य ज्योतिबा खराटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय राठोड, युवानेते सचिन नाईक व माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी प्रकाश गायकवाड यांना समाजभूषण,भाग्यवान भवरे यांना विशेष समाजरत्न, राज गायिका कु. स्वराली जाधव हिला माहूर भूषण, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांना मुकनायक, आलियाबेगम आजीस खान फारुकी यांना विरमाता रमाई, माजी सभापती वसंत कपाटे यांना सामाजिक कार्यकर्ता व हाजी कादर दोसाणी यांना मुकनायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, प्रा. राजेंद्र लोणे, सिद्धार्थ मुनेश्वर, रविंद्र गायकवाड, आशुतोष इंगोले, एस. एस. पाटील, महेंद्र वाघमारे, दीपक कांबळे, केशव भगत, रेणुकादास पंडित, विनोद कांबळे, विजयपाल वाढवे, विनोद शेंडे, संजीव वाठोरे, राहुल कायटे, विजय भगत, प्रकाश मुनेश्वर, प्रितीश पंडित यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाला पो. नि. डॉ. नितीन काशीकर, स. पो. नि. श्रीधर जगताप, शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, प्रा.डी. यु. जाधव, प्रा.इकबाल खान, मुख्याध्यापक श्याम राठोड, विकास शिंदे, किसन राठोड, उपकार्यकारी अभियंता वसंत झरीकर, संजय मारवाडे, तथागत कावळे, मारोती रेकुलवार, प्रफुल्ल कऊडकर, दिलीप मुनगिनवार यांचेसह नगरसेवक व मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.दु.12 ते 2 वाजे पर्यंत अन्नदान व 4 वाजेपासून भव्य मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती संयोजक सिद्धार्थ तामगाडगे व शंकर कांबळे यांनी दिली.

Copyright ©