यवतमाळ सामाजिक

इंजिनीयर तरुणाने नोकरी सोडून थाटला स्वतंत्र दुग्ध व्यवसाय

इंजिनीयर तरुणाने नोकरी सोडून थाटला स्वतंत्र दुग्ध व्यवसाय

आत्मनिर्भर होत इतरांना मिळऊन देणार रोजगार

कळंब तालुक्यातील टपालहेटी येथील तरुण मयुर दीपकराव काकडे यांनी अभियांत्रिकी (इंजिननिअर) शिक्षण घेउन पुणे येथील कंपनीत नौकरी करीत होता.नोकरी करीत असताना नेहमी त्याला एक प्रश्न पडायचा आपणा आपल्या गावात राहुन गावाच्या विकासासाठी काही तरी केले पाहिजे याच विचारातून मयूर याने कृषी विभागा मार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिर्या उद्योग अंतर्गत आर्थसाय मिळवून आपल्या छोट्याशा टपालहेटी गावी दंडवत दुग्धालयाची स्थापना केली. या दुग्धालयाला लागणारे दूध योग्य भाव देत गावासह तालुक्यातून संकलन केल्या जाईल याने तालुक्यातील जनतेला फायदा होईल.या दंडवत दूग्धालयात दुधापासून खवा, पेढा, तूप, बासुंदी व अनेक प्रकारच्या मिठाई बनवून याची विक्री तालुक्या पूर्ती न ठेवता संपूर्ण जिल्यात विक्री करायचा मानस या तरुणाने पत्रकार शक्ती च्या प्रतिनिधिला बोलून दाखवला आहे.

एका छोट्याशा गावी टपालहेटी येथे अभियांत्रिकी मुलाने नोकरी सोडून दुग्ध व्यवसायात उतरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दंडवत दुग्धालयाला जिल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, यांनी भेट दिली याप्रसंगी तहसीलदार डॉ सुनील चव्हाण, कृषीअधिकारी शुभ्रकांत भगत, व अन्य प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते…

Copyright ©