Breaking News यवतमाळ

शासकीय माहाविद्यालंय व रुग्नालयात बोगस वार्डबॉयचा धुमाकुळ

शासकीय माहाविद्यालंय व रुग्नालयात बोगस वार्डबॉयचा धुमाकुळ

श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय माहाविद्यालय व रुग्णालंय यवतमाळ येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराने सर्व सामन्यात असंतोष निर्माण होत आहे. चतुर्थ कर्म चारी हे आपल्या जागेवार रोजाने माणसं लावून स्वत: आपले वैयक्तिक कामे सांभाळत आहे. येथील अनाधुंद कारभार सुरू झाला आहे येथील गैरप्रकार गेल्या कित्तेक वर्ष्यापासून सुरु असून कोणत्याही वैद्यकीय याची दखल घेतली नाही यांनी चक्क डोळ्यावर पट्टी बांधून सुरू असलेल्या गैर प्रकाराला खत पाणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.येथील एकही अधिकारी गैर प्रकाराला आळा घालत नसल्याने दिवसे न दिवस गैरप्रकार वाढतच आहे या ठिकाणी अनेक कर्मचारी बोगस वार्डबॉय म्हणून कार्यरत असल्याने रुग्णालयात अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचे बोलल्या जात आहे.रुग्णालयातील अनेक परकारची सामग्री अदृश्य होत आहे तर कित्तेक आवश्यक माहागड्या वस्तू गायब होत आहे.रुग्णालंय परिसरात प्रत्येक ठिकाणी सी सी टीवी कॅमरे लावून असूनही रुग्णालयातून कोण काय लंपास करित आहे.या कडे कुणीही लक्ष देत सी सी टी व्ही हि शोभेची वस्तू झाली आहे सुरक्षा रक्षकांना कोण बोगस आणी कोण खरे कर्मचारी याची जराही माहिती नसल्याने या बोगस वार्डबॉय कर्मचाऱ्यानवर दुर्लक्ष केल्या जात आहे.हे कर्मचारी वार्डबॉय बोगस असल्याने हे कधीही युनिफॉम चा वापर करित नाही या मुळे कर्मचारी कोण आणी पेशंट चे नातेवाईक कोण हे ओळखणे कठीण झाले आहे.परंतु असली नकली चे वहिखाते चतुर्थ श्रेणी कर्मचार्याच्या मुकादम यांच्या जवळ असल्याने मुकादम यांना पुरेपूर माहिती आहे.मात्र फुकटाच्या मिळाऱ्या पगारतून हे कर्मचारी मुकादम यांना वाटा देऊन गप्प बसवत असल्याचे चर्चिल्या जात आहे.याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे

Copyright ©