यवतमाळ सामाजिक

अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी वैयक्तिक योजनेत १० लाखापर्यंत अनुदान

अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी वैयक्तिक योजनेत १० लाखापर्यंत अनुदान

सामाईक पायाभुत सुविधा उभारणीसाठी तीन कोटींपर्यंत अनुदान

यवतमाळ, दि ११ एप्रिल : सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.

वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

 

सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)

 

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

 

मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.

 

बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.

 

काय आहे योजनेचा उद्देश?

 

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.

 

कोठे संपर्क करावा

 

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.

 

कोणते अन्नप्रक्रिया उद्योग

 

दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,लस्सी.

मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.

 

पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,

 

आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट

 

प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.

 

■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व

 

प्रकारची तेल उत्पादने.

 

■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,

 

ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.

 

■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य

■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे

■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.

■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.

समता पर्वअंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे विविध कार्यक्रम

यवतमाळ, दि११ एप्रिल :- १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समतापर्व राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.

 

दिग्रस तालुक्यातील इसापुर येथील अनुसुचीत जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत शासकीय योजनेची जत्रा व समता पर्व अंतर्गत यु पी एस सी, एम पी एस सी ची तयारी करणा-या विद्यार्थ्याना मार्गदर्शन कार्यक्रम’ घेण्यात आला. समतादूत श्री. बडोले व श्रीमती बडोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय शाळेत सामाजिक समता पर्व अंतर्गत इयत्ता ८ वी साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य” तर वर्ग ,9 वी साठी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक सुधारणेतील योगदान”या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. आर.एस. लिचडे परिश्रम घेतले. शाळेतील विद्यार्थिनींनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 

या सोबतच इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थिनींसाठी भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता 6 वी ते 9 वी मधील 15 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत श्रवणीय भीम गीते सादर केली. या गीतामधून शाळेतील विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष,सामाजिक चळवळ, भावनिक प्रसंग,माता रमाईची साथ इत्यादी घटना गीतातुन व्यक्त केल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिक्षक एस जी बरडे यांनी कामकाज पाहिले.

 

क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित” प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थिनींचे 4 गट पाडण्यात आले. यामध्ये सदरील गटांना स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय या घटनात्मक मूल्यांची नावे देण्यात आली. प्रत्येक वर्गाच्या गटासाठी तीन विद्यार्थिनी निवडण्यात आल्या. या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी एकूण चार फेऱ्या घेऊन (सरळ प्रश्न,विकल्प प्रश्न,जलद प्रश्न,निवड प्रश्न) प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संदर्भात प्रश्न विचारून त्यांचे स्पष्टीकरण करण्यात आले. अटीतटीच्या स्पर्धेत वर्ग नववीच्या विद्यार्थिनीनी प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून एस.एस. बोरीकर यांनी कामकाज पाहिले.

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अंतर्गत येणा-या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह यवतमाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण, यवतमाळ, डॉ. इरफान तुघलकर,आशिष खडसे, शुभम पारधी, ज्ञानेश्वरी बोबडे, अभय मुटकुरे, कु. दिक्षा व कु. स्नेहल उपस्थित होते.

 

सदर रक्तदान शिबिरात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमाळ कार्यालयातील तसेच शासकीय निवासी शाळेतील कर्मचारी, शासकीय मुलींचे वसतीगृह यवतमाळ येथील विद्यार्थीनी, समाज कार्य महाविद्यालयीन विद्यार्थी, म.ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती चे कार्यकर्ते व ब्रिक्स कर्मचारी यांच्यासह 35 रक्त दात्यांनी रक्तदान केले.

Copyright ©