यवतमाळ सामाजिक

शिवणकलातुन महिलांना मिळणार रोजगार सिंहझेप समर्पण सखीचा पुढाकार : मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

शिवणकलातुन महिलांना मिळणार रोजगार
सिंहझेप समर्पण सखीचा पुढाकार : मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ : महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांना उद्योग व्‍यवसायातून आर्थिक बळ मिळाल्यास त्यांचा नक्की सर्वांगिण विकास होईल व उदरनिर्वाहाचे साधन देखील मिळेल, या उदात्त हेतून दैनिक सिंहझेप समर्पण सखी व पायल लेडिज फॅन्सी ड्रेस मेकर यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने युवती व महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिला व युवतींनी विविध कौशल्यात वृद्धी करुन आत्मनिर्भर बनून घरपरंपचा सोबतच व्यवसायातून स्वावलंबी होत इतरांनाही काम देवुन स्वतःसह इतरांचे आधार व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासोबत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून शिलाई मशीन प्रशिक्षणातून ग्रामीण भागात महिला-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करत आहे. शिवणकला प्रशिक्षणाद्वारे मुलींना व महिलांना टेलरिंगमध्ये प्रशिक्षित करून रोजगार मिळवून देणे, यामध्येे गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन दुर्गा मिश्रा संयोजिका, सौ. साक्षी अंबरकर अध्यक्ष, सौ. दिपाली ठाकरे प्रकल्प अधिकारी, सौ. खुशी राऊत प्रकल्प अधिकारी यांनी केले.

कधी, केव्‍हा व कुठे?
 दि. १६ ते २५ एप्रिल २०२३
वेळ दु. २ ते सायंकाळी ७ पर्यंत
स्थळ : पायल लेडीज फॅन्सी ड्रेस मेकर श्री साई अपार्टमेंट बाबाजी दाते महिला बँकेसमोर माईंदे चौक, संकटमोचन रोड यवतमाळ
सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना साहित्य विकत घ्यावे लागेल.

Copyright ©