महाराष्ट्र सामाजिक

नखेगांव येथे समाजसुधारक महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

  • नखेगांव येथे समाजसुधारक महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

माहूर : सुरेखा तळनकर 

माहूर तालुक्यातील मौजे नखेगांव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकाच्या नामफलकाचे आनावरण करण्यात आले होते. यावेळी हनुमान मंदिरा जवळ महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती साविञीमाई फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील प्रथम नागरिक शालुताई विठ्ठल परचाके युवासेना जि.प्रमुख यश खराटे,निरंजन केशवे यांचेसह प्रमुख पाहूण्याच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी प्रमुख मान्यवरांनी समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जिवनावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व फुले प्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती नोंदवली होती. या प्रसंगी माजी सरपंच ज्ञानेश्वर सुरोशे, मारोतराव गायकवाड (पोलीस पाटील ), सामाजिक कार्यकर्ते सुभाष गवळी, तुकाराम राठोड नागोराव गवळी, युवासेना तालुका समन्वयक आर्शिवाद आडावे, पञकार कार्तिक बेहेरे यांची उपस्थिती होती.तदनंतर येथील प्रमुख चौकात महात्मा फुले चौकाच्या नामफलकाचे आनावरण करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष वाघमारे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आदेश बेहेरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले,शाहु,आंबेडकर प्रेमी बांधवांनी परिश्रम घेतले.

Copyright ©