महाराष्ट्र सामाजिक

माहूर येथे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सयुक्त सार्वजनिक जयंती।

श्रीक्षेत्र माहूर:- सुरेखा तळनकर

माहूर येथे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सयुक्त सार्वजनिक जयंती। 

५० खाटाचे रुग्णालय व डायलेसीस केंद्र उभारण्यास प्रयत्नशील आ भीमराव केराम

माहूर- माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने येथे भाविकांची सततची वर्दळ व येथील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळणेसाठी ५० खाटाचे रुग्णालय व डायलेसीस केंद्र उभारण्यास प्रयत्नशील असून व्यक्तीशः मी व भारतीय जनता पक्षाचे केंद्र व राज्य सरकार आरोग्य सुविधाच्या बाबतीत आग्रही असल्याने लवकरच ही मागणी पूर्ण करण्यात येईल तसेच किनवट जिल्हा व मांडवी इस्लापूर बोधडी तालुका निर्माण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन आ. भीमराव केराम यांनी येथे केले.

माहूर येथे दि. ११ रोजी बौद्ध भूमी परिसर माहूर येथे सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्या निमित्त राष्ट्रीय युवक काँग्रेस डॉ.सेल व मेडिकेअर पुसद यांच्या विद्यमानाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी उपस्थित केलेल्या डायलेसीस सुविधेच्या मागणीचा धागा पकडून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे डॉ.आशीष पवार तालुका आरोग्य अधिकारी माहूर, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे सर, धरमसिंग राठोड, कादर दोसानी, मनोज कीर्तने, अनिल वाघमारे, भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. दिनेश येउतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने यांची उपस्थिती होती. शिबिरासाठी पुसद येथील तज्ञ डॉ.विरेन पापळकर, डॉ. अरुणा पापळकर डॉ. सतीश चिद्दरवार, डॉ.सुप्रिया चिद्दरवार, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.लता अग्रवाल, डॉ. अंकुर जैन, डॉ. सचिन थोरकर,डॉ. विक्रांत लोहकर,डॉ.राहुल जाधव, डॉ. हर्षल येरकाडे, डॉ.पंकज तालोकर, यांच्यासह माहूर येथील डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. व मोफत औषधी वाटप (प्रथम उपचार) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारम योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना, इत्यादी योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात २०० रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला तर ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.वंसतराव नाईक शा.वै. महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी चमूने रक्त संकलन केले. यावेळी नगरसेविका सौ. नंदा कांबळे, शीला रणधीर पाटील, रेणुकादास वानखेडे, रणधीर पाटील, आकाश कांबळे, अर्जुन बरडे,आकाश वानखेडे, सचिन बेहेरे, आदीसह अनेकांची उपस्थिती होती,

Copyright ©