महाराष्ट्र सामाजिक

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- पंकज तडस

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

क्रिडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतात. सन 2019-20 व 2020-21 साठी देण्यात येणा-या पुरस्कारांसाठी दि.20 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

अर्जाचा नमुना दि.18 एप्रिल पर्यंत कार्यालयीन वेळेत वितरीत करण्यात येत आहे. जिल्हा युवा पुरस्कारासाठी इच्छुक युवक व युवती तसेच नोंदणीकृत संस्था पात्र असणार आहे. युवक व युवतीसाठी पुरस्कार राशी 10 हजार रुपये रोख व संस्थांसाठी 50 हजार रुपये रोख स्वरुपात व गौरवपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी अर्जदार महाराष्ट्रातील सलग पाच वर्षापासून वास्तव्य असलेला असावा. त्याचे वय 13 वर्ष ते 35 वर्ष असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरनोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था, युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राद्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.

अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम पंजीबंध्द असावी. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर किमान 5 वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार, संस्थेच्या सदस्याचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखल देणे आवश्यक आहे. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Copyright ©