यवतमाळ सामाजिक

महात्मा फुले व बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे जगातील सर्वात शिक्षित होऊ शकलो डॉ. पी. ए. सुधाकर 

महात्मा फुले व बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे जगातील सर्वात शिक्षित होऊ शकलो डॉ. पी. ए. सुधाकर 

समता पर्व 2023 च्या महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावर दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी डॉ.पी. जे.सुधाकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी शिक्षित होऊ शकलो असे प्रतिपादन केले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान राष्ट्र घडवण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असून त्यांनी उपाधी दिली. त्यानी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा पाया घातला आहे. त्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य असून त्याची प्रेरणागत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरणार मी जरी 128 पदवी आणि 17 पीएचडी केली असली तरी माझे प्रेरणास्थान महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. जगामधील सर्वाधिक शिकलेले व्यक्तिमत्व डॉ. पी जे सुधाकर यांनी समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त केले.

भारतीय संविधानाविषयी आपलं मत व्यक्त करत असताना संविधानाने तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. त्या अधिकाराच्या अनुषंगानेच आपल्या जीवनाची परिक्रमा सुरू आहे. वादीवाद होत असला तरी संसदेचा एकूण संदर्भ लक्षात घेता यावेळी प्रामुख्याने ज्या गोष्टी चा आराखडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. भारतीय समाज व्यवस्थेला जर समजा भरभककम करायचं असेल आणि समानता आणायचे असेल तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारतीय न्यायव्यवस्था ही स्वतंत्र संस्था असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आणि म्हणून विद्यमान असणारे न्यायाधीश चंद्रचूड माझे जवळचे मित्र आहेत त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा भारतीय संविधानाची ताकद काय आहे ते माहित पडते सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आपलं मत व्यक्त करत असताना ज्या समाजामध्ये दुर्लक्षित असणाऱ्या स्त्रियांना व त्यांच्या आपत्यांना दूर लोटले जात होते त्यांना जवळ घेऊन त्यांच्यासाठी आश्रम व्यवस्था सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना मी नतमस्तक होतो सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या आंदोलनाची निव राहिली आहे ल.त्यामुळे येणाऱ्या काळात महिलांना भरभक्कम अशी विचारधारा सावित्रीबाई फुले च्या प्रेरणातून मिळालेली आहे. यावेळी प्रामुख्याने डॉ. पी जे सुधाकर यांचा एक क्षण गौरवाचा कार्यक्रम झाला शेकडो कार्यकर्त्यांनी मंचावर जाऊन त्यांचे स्वागत केलं त्यांना समता पूर्व प्रतिष्ठानच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अनुषंगाने यवतमाळ येथील पत्रकार प्रवीण देशमुख यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले तर ग्रामीण विभागातून पत्रकारिता करत असताना विविध प्रकारच्या समस्या सोडून समाजाला न्याय दिला तर काम करणाऱ्या पत्रकार किशोर वंजारी यांना समता शोध वार्ता पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर शहारे ,विशेष अतिथी नरेंद्र फुलझेले ,रवी कीर्ती, आशिष देवगडे, सुरज राठोड ,प्रदीप झाडे ,योगेश संजय मानकर, ॲड.रामदास राऊत, दीपक नगराळे प्रमोदिनी रामटेके, ॲड. नरेंद्र मेश्राम ,दिलीप गावडे, डॉ.बाळकृष्ण सरकटे, धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे, घनश्याम नगराळे, इंजि. अशोक तिखे ,घनश्याम भारशंकर, माधुरी ढेपे मंचावर उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्कार डॉ. पी जे. सुधाकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर शहारे परिचय नारायण फुल संचालन अंकुश वाकडे आभार संचिता सोनटक्के यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन, विजय डोंगरे जितेंद्र ढाणके ,भोजराज भगत, नंदू कावडे विवेक वानखडे, रमेश वाघमारे ,अंकुश पाटील ,शंतनू देशभ्रतार, विजय मालखेडे, भाग्यश्री खडसे, हरिदास मेश्राम,खुशाल भगत, प्रा. शिलानंद मेश्राम यांनी केले.

Copyright ©